मुंबई, 18 ऑगस्ट : मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी (Monsoon in Maharashtra) पोषक हवामानाची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत (Rain in Maharashtra) आहेत. दरम्यान IMD ने काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील 3 ते 4 तास या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालघर आणि रायगड येथील नागरिकांनी पुढील 3 तास अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
Nowcast warning issued at 2200 Hrs 18/08/2021 :
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 18, 2021
Moderate spells of rain very likely to occur at isolated places in the districts of #Mumbai #Ratnagiri, #Solapur, #Satara, #Sangli, #Beed, #Osmanabad during next 3-4 hours.
-IMD MUMBAI
Nowcast Warning issued at 2200 Hrs 18/08/2021:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 18, 2021
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of #Palghar, #Raigad during next 3 hours.
-IMD MUMBAI
हवामान खात्यानं आज यवतमाळ या एकमेव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यात पावसाचा काहीसा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या पालघर, नंदूरबार, बुलडाणा, अकोले आणि वाशीम या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. उर्ववरित महाराष्ट्रात उद्या कोरड्या हवामानाची शक्यता आहे.