पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला 6000 रुपये पाठवण्यात येतात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवले जातात. दरम्यान या योजनेचा नववा हप्ता (9th Installment of PM Kisan Scheme) जारी करण्यात आला आहे. दरम्यान 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे
या शेतकऱ्यांना लाभार्थी नसूनही या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने पीएम किसान योजनेचा (PM KISAN) फायदा उचलला आहे, त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. अनेक राज्य सरकारांनी अशा लोकांना रिकव्हरी नोटीस (Recovery Notice) जारी करून वसूली सुरू केली आहे. जाणून घ्या कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत...
PM Kisan चा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणं आवश्यक आहे. तुम्ही दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शेतजमीन वडील किंवा आजोबांच्या नावावर असेल तरी या योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील