Home /News /videsh /

यक्स! उडत्या विमानातून झाला मलमूत्राचा वर्षाव; विमानतळाजवळ अजब घटना

यक्स! उडत्या विमानातून झाला मलमूत्राचा वर्षाव; विमानतळाजवळ अजब घटना

विमानतळाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर अचानक मलमूत्राचा वर्षाव (Flying poop) झाला.

लंडन, 21 ऑक्टोबर: आकाशातून अचानक काही घाण पडली तर... म्हणजे कचरा नव्हे मनुष्य विष्ठा (human excreta) वगैरे काही...   कल्पनेनेदेखील किळस वाटते ना? पण उडत्या विमानातून हा असा मलमूत्राचा पाऊस एका व्यक्तीने नुकताच अनुभवला. इंग्लंडमधल्या (England) एका व्यक्तीला हा भयंकर किळसवाणा अनुभव आला. खरं तर अशा घटना घडण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे; पण इंग्लंडमध्ये नुकत्याच नागरी वस्तीत हा प्रकार उघडकीस आल्याने अशा घटनांना उजाळा मिळाला आहे. आजकाल विमानाने (Plane) अनेक तासांचा प्रवास करून सातासमुद्रापार जाणं अगदी सोपं झालं आहे. इतका प्रदीर्घ प्रवास आरामदायी व्हावा यासाठी विमानात सर्व सोयीसुविधा असतात. प्रवाशांना जेवणखाण, चहा-पाणी अशा सर्व गोष्टी दिल्या जातात. विमानात नैसर्गिक विधीसाठी टॉयलेटचीही सोय असते. विमान मुक्कामावर पोहोचल्यावर टॉयलेट टँक (Toilet Tank) साफ केला जातो; पण विमान उडत असताना त्यातून मलमूत्राची (Sewage) घाण खाली पडण्याच्या घटना फार अपवादात्मक वेळा घडल्या आहेत. जुलैमध्ये एका उड्डाणादरम्यान इंग्लंडमधल्या विंडसर कॅसलजवळ (Windsor Castle) राहणाऱ्या एका ब्रिटिश नागरिकाला (British Citizen) अशा विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

अरे हे काय? ती बातम्या देत होती आणि मागे सुरू होतं Porn; न्यूज चॅनेलवरील तो VIDEO पाहून प्रेक्षकही Shocked

 'दी इंडिपेंडंट'ने दिलेल्या माहितीनुसार, क्लीवर ईस्टच्या (Clewer East) कौन्सिलर कॅरेन डेव्हिस (Karen Davis) यांनी रॉयल बरो ऑफ विंडसर (Royal Borough of Windsor) आणि मेडेनहेडच्या एव्हिएशन फोरममध्ये (Maidenhead’s aviation forum) या अत्यंत विचित्र आणि किळसवाण्या अनुभवाबद्दल सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. लंडनच्या हिथ्रो विमानतळाजवळ येणाऱ्या एका विमानातून अचानक मलमूत्राचा वर्षाव झाला. विंडसर कॅसलजवळ राहणाऱ्या त्या ब्रिटिश नागरिकाची संपूर्ण बाग, बागेतल्या छत्र्या यावर सर्वत्र ती घाण पडली होती.
विमानात सामान्यतः एका टाकीमध्ये मलमूत्र, सांडपाणी साठवलं जातं. विमान उतरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. थंड तापमानामुळे ही घाण गोठते. त्यामुळे असा प्रसंग उद्भवत नाही. त्यामुळे विमानातून मलमूत्र गळती होण्याची ही दुर्मीळ घटना असल्याचं म्हटलं जात आहे. डेव्हिस यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात याबाबत माहिती देण्यात आली आहे. डेव्हिस म्हणाल्या, की दर वर्षी विमानातून फ्रोझन (गोठलेल्या) मैला पडण्याच्या अनेक घटना घडतात; पण या घटनेत पडलेला मैला फ्रोझन नव्हता. त्यामुळे हा प्रकार अत्यंत किळसवाणा होता. सगळी बाग या घाणीने भरून गेली होती. ..तरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात एंट्री मिळणार; मोदी सरकारचा कडक नियम 'त्या वेळी ही व्यक्ती नेमकी बागेत असल्यानं तर हा अनुभव त्याच्यासाठी फारच विचित्र आणि भयावह ठरला,' असंही डेव्हिस यांनी नमूद केलं. दरम्यान, या ब्रिटिश नागरिकाने रूट ट्रॅकिंग नकाशाद्वारे (Root Tanking Map) विमान ओळखून विमान कंपनीशी संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली; मात्र त्याने दुर्गंधी पसरवणाऱ्या या विचित्र घटनेसाठी विम्याचा दावा केलेला नाही. तसंच, विमान कंपनीचं नावही उघड केलेलं नाही, असं बीबीसीने आपल्या अहवालात म्हटलं आहे. इटन अँड कॅसलच्या कौन्सिलरने ही घटना अब्जावधीत एकदा घडणारी असल्याचं म्हटलं आहे. मलमूत्राच्या वर्षावासाठी त्याने उबदार हवामानाला जबाबदार धरलं आहे. वातावरण उष्ण असल्याने ही घाण द्रवस्वरूपात राहिली आणि बाहेर पडली असं त्यानं म्हटलं आहे. 40 वर्षं विमानतळांवर काम केलेले पॅरिश कौन्सिलर ग्रॉफ पॅक्सटन यांच्या मते यासारख्या घटना फार क्वचितच घडतात. गेल्या अनेक वर्षांत अशी घटना घडली नव्हती. आता विमानांमध्ये व्हॅक्यूम शौचालयं (Vaccume Toilets) असल्यानं ती जास्त सुरक्षित असतात, असंही त्यांनी नमूद केलं.
First published:

Tags: Airplane, England, Travel by flight, United kingdom

पुढील बातम्या