मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /भारतात एंट्री हवी तर RT PCR टेस्ट रिपोर्ट दाखवावाच लागणार; International passengers साठी कडक नियम

भारतात एंट्री हवी तर RT PCR टेस्ट रिपोर्ट दाखवावाच लागणार; International passengers साठी कडक नियम

भारताने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार RT PCR TEST चा रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे.

भारताने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार RT PCR TEST चा रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे.

भारताने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार RT PCR TEST चा रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर :  कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) थैमान अद्यापही कमी झालेलं नाही. भारतात बऱ्यापैकी कोरोना नियंत्रणात आला आहे. तरी मोदी सरकारने सावध भूमिका घेतली आहे. आता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना टेस्ट रिपोर्ट (Corona test) बंधनकारक केला आहे. भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट (RT PCR Test) रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच भारतात एंट्री मिळणार आहे (RT PCR test report mandatory for international-passengers)

केंद्रीय आरोग्य मंत्रायलायने भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार भारतात येण्यासाठी प्रवाशांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. तरच भारतात प्रवेश दिला जाणार आहे, असं  आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे आरटी-पीसीआर टेस्टमधून कळतं. सध्या हीच टेस्ट सर्वत्र केली जाते आहे. यामध्ये संक्रमित व्यक्तीचे नाक किंवा घशातील स्वॅबचे नमुने घेतले जातात. हे नमुने आणि व्हायरसच्या डीएनएची तुलना केली जाते. दोघांमध्येही समानता असेल तर त्या व्यक्तीला कोरोना आहे असं निदान केलं जातं. या तपासणीला चार ते सहा तासांचा अवधी लागू शकतो.

हे वाचा - कोव्हॅक्सिनला अजूनही जागतिक मंजुरीची प्रतीक्षा; आता WHO नं मागितली ही माहिती

एकीकडे लसीकऱणाचा वाढलेला वेग आणि दुसरीकडे नवा व्हेरियंट न येणं या कारणांमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट टळली असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेचा वर्तवण्यात आलेला धोका टळल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. लाटेचा धोका टळला असला तरी (No third wave but existence of virus for longer time) कोरोनाचा धोका मात्र कायम असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारने सावध राहिलं आहे.

ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाचा डेल्टा व्हेरिटएंट थैमान घालतो आहे. लसीकरणानंतरही हा व्हायरस पसरतो आहे. त्यात ब्रिटनने आपले हवाई मार्ग पूर्णपणे खले केले आहेत, त्यामुळे ब्रिटन-भारतातील नागरिकांच्या प्रवास होऊ शकतो आणि भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारताने असं कठोर पाऊल उचलल्याचं दिसतं आहे.

हे वाचा - या देशातही कोरोनाचा विस्फोट; आता 1 महिन्याचा लॉकडाऊन लावावाच लागला, स्थिती बिकट

भारतात आता कोरोना ही ‘एंडेमिक’ बनत असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक  डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं आहे. अर्थात, कोरोनाचं अस्तित्व कायम राहणार असून या रोगाचा दीर्घकाल मुक्काम जगात राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, India, International, Travel