Home /News /videsh /

पाकिस्तानात हिंदू मंदिरात तोडफोड, दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

पाकिस्तानात हिंदू मंदिरात तोडफोड, दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

पाकिस्तानातील कराचीमध्ये कट्टरपंथियांनी नरियन पोरा हिंदू मंदिरावर हल्ला केला आहे. कट्टरपंथियांनी दुर्गा माता मंदिरात तोडफोड केली असून दुर्गा मातेच्या मूर्तीचीही विटंबना केली आहे.

  नवी दिल्ली, 21 डिसेंबर : पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील कराचीमध्ये कट्टरपंथियांनी नरियन पोरा हिंदू मंदिरावर हल्ला केला आहे. कट्टरपंथियांनी दुर्गा माता मंदिरात तोडफोड केली असून दुर्गा मातेच्या मूर्तीचीही विटंबना केली आहे. पाकिस्तानी पत्रकाराने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मागील 22 महिन्यात हिंदू मंदिरावरील हा 9वा मोठा हल्ला असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, की सुप्रीम कोर्टाकडून नोटिस जारी करण्यात आल्यानंतर आणि सरकारकडून मंदिरांच्या संरक्षणाबाबतचे दावे करण्यात आले असूनही हिंदू मंदिरावर हा 9वा हल्ला झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक व्यक्तीने मंदिरात प्रवेश करुन तोडफोड करण्यास सुरुवात केली. परंतु नागरिकांनी आरोपीला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ANI नुसार, मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे, की आरोपीविरोधात इशानिंदा संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Shocking Report: दहशतवादासंबंधी अमेरिकेने प्रसिद्ध केला अहवाल, भारताला धोका?

  मागील काही वर्षात पाकिस्तानमध्ये कट्टरपंथियांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या हल्ल्यांप्रकरणी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गणेश मंदिरावर कट्टरपंथियांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात पंजाब राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महानिरीक्षकांना समन्स बजावला होता. या प्रकरणी पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 24 तासानंतर एक निवेदन जारी करत, मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं आश्वासनही दिलं होतं.

  कुत्रा नसता तर आम्ही लेक गमावली असती, Viral होतेय एका आईची भावनिक पोस्ट

  त्याशिवाय मागील वर्षी पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा येथे कट्टरपंथियांनी करक मंदिरावर हल्ला करत तोडफोड केली होती. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय दिला होता. ऑक्टोबरमध्ये अज्ञातांनी सिंध प्रातांतील हनुमान देवी माता मंदिरात हजारो रुपये आणि दागिन्यांची चोरी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Hindu, Pakistan, Temple

  पुढील बातम्या