न्यूयॉर्क, 16 डिसेंबर: आपला कुत्रा (Dog) नसता तर आज आपल्या मुलीचे (Daughter) प्राण वाचू शकले नसते, अशा भावना एका महिलेनं सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्या आहेत. अनेकांना पाळीव प्राण्यांपासून (Pets) अनेक चांगले अनुभव येत असतात. काही वेळा पाळीव प्राण्यांमुळे लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो, कधी त्यांचं डिप्रेशन निघून जातं तर कधी त्यांना काही काळासाठीचा विश्वासाचा आणि प्रेमाचा जोडीदार मिळतो. कुत्र्याने केलं जागं केली अँड्र्यू नावाच्या महिलेनं आपल्या कुत्र्याचा एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या कुत्र्याचं नाव आहे हेन्री. घटनेच्या दिवशी त्यांची मुलगी आजारी होती आणि तिच्या खोलीत बेडवर झोपली होती. हेन्री सतत तिच्याजवळ जात होता आणि तिला झोपेतून जागं करण्याचा प्रयत्न होता. आपल्या आजारी मुलीला आपला कुत्रा सतत त्रास देत असल्याचं तिच्या आईवडिलांना वाटत होतं. त्यामुळे ते हेन्रीला तिच्यापासून हाकलण्याचा प्रयत्न करत होते. हेन्रीचा हट्ट महिला आणि तिच्या पतीनं हाकललं तरी हेन्री त्या मुलीची पाठ सोडायला तयार नव्हता. इतक्या वेळा हेन्रीनं उठवूनही आपली मुलगी उठत नसल्याचं महिलेच्या लक्षात आलं. तिनं मुलीजवळ जाऊन पाहिलं तर तिचा श्वास मंदावला होता आणि ती बेशुद्ध पडली होती. हे समजताच त्यांनी तातडीनं तिला रुग्णालयात दाखल केलं. हे वाचा - Year Ender 2021: ‘या’ टॉप 10 वेब सीरीजनी यावर्षी केला होता धमाका; पाहा LIST कुत्र्यामुळे वाचले प्राण आपल्या कुत्र्यामुळेच आपले प्राण वाचल्याचं सांगताना कुत्र्याविषय़ी तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. हेन्रीने मुलीला उठवण्याचा प्रयत्न केला नसता, तर तिचा श्वास मंदावल्याचं आमच्या लक्षातही आलं नसतं आणि आपल्या मुलीचा जीव गेला असता, असं सांगताना ती भावूक झाली आहे. यावर नेटिझन्सची वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी आपापल्या पाळीव प्राण्यांचे किस्से शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.