तुम्ही ऑनलाइनही होऊ शकता कोरोनाचे शिकार, तुम्हालाही आलाय का असा Email? चुकूनही क्लिक करू नका

तुम्ही ऑनलाइनही होऊ शकता कोरोनाचे शिकार, तुम्हालाही आलाय का असा Email? चुकूनही क्लिक करू नका

कोरोनाव्हायरसने (Coronavirus) चीनमध्ये थैमान घातलंय आणि भराभर हा विषाणू जगभर पसरतोय. पण हा व्हायरस आता ऑनलाईन पसरत चाललेला आहे. हा प्रकार नेमका काय आहे हे ऐकूण तुम्हाला धक्का बसेल.

  • Share this:

नवी  दिल्ली, 15 फेब्रुवारी : जगभरात कोरोनाव्हायरने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. कोरोनाव्हायरसची पहिली घटना 2 महिन्यांपूर्वी चीनमध्ये समोर आली होती. आता हा व्हायरस सगळीकडे पसरू लागला आहे. जवळपास प्रत्येक देशात या व्हायरसचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे आता कोरोनाव्हायरसच्या नावानेच लोकांना भीती वाटू लागली आहे. आतापर्यंत कोरोनाव्हायरसमुळे 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. येणाऱ्या काळात मृत्यूंची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. यातच हा आजार आता ऑनलाईनही परसत आहे.

ऑनलाईन पसरत चाललेला हा आजार नेमका काय आहे हे ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. ऑनलाइन पसरत चाललेला हा आजार म्हणजे कोरोनाव्हायरसच्या नावावर ऑनलाईन फ्रॉड आणि हॅकिंगच्या घटना घडत आहेत. कोरोनाव्हायरसच्या नावावर लोकांना ईमेल पाठवून हॅकर्स ऑनलाईन फ्रॉड करून लोकांकडून पैसे उकळत आहेत.

 वाचा - स्कूल व्हॅनचा स्फोट होऊन लागली आग, 4 मुलांचा जळून मृत्यू

Mimecast या सिक्युरिटी फर्मने असा एक फिशिंग ईमेल पकडला आहे. या ईमेलमधून थेट कोणत्याही पैशाची मागणी केली जात नाही तर समोरच्या व्यक्तीला अर्लट केलं जातं. आणि याच अर्लट नोटिफिकेशनमधून समोरचा व्यक्ती या फ्रॉडचा शिकार होतो. या फिशिंग ईमेलमध्ये तुम्हाला एक लिंक आणि pdf फाइल पाठवली जाते. त्यामध्ये कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी उपाय सांगण्याचा दावा केला जातो.

हे हॅकर्स इतक्यावरच थांबलेले नाहीत तर, या खोट्या ईमेलसोबत World Health Organisation (WHO) या संस्थेचं पेज सुद्धा लिंक करण्यात आलेलं असतं. त्यामुळे या ईमेलची विश्वासार्हता वाढते आणि कुणीही या जाळ्यात अडकू शकतं.

यामध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाते. जी ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी कन्फर्म करण्यासाठी सांगितला जातो. त्याचबरोबर तुमची इतर माहितीही भरण्यासाठी सांगितली जाते.

वाचा - ATM च्या वापरावर मोजावं लागणार ज्यादा शुल्क

तुम्ही जसजसे पुढे हा मेल वाचत जाता तसं एक लिंक दिली जाते ज्यामध्ये एक डॉक्युमेंट मिळतं. या डॉक्युमेंटमध्ये कोरोनाव्हायरसपासून वाचण्याचा उपाय देण्याचा दावा केला जातो. त्यातच एक डाऊनलोड करण्याची लिंक आणि पर्यायही दिली जाते. त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं अकाऊंट हॅक होतं. त्यामुळे तुम्हाला जर असा कोणताही ईमेल आला तर त्याच्या आहारी जाऊ नका. कोरोनाव्हायरसमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आणि त्याचमुळे हॅकर्स असे फ्रॉड्स करत आहेत.

वाचा - 23 जणांना मिळाला 'ड्रीम जॉब', 9 तास झोपण्याचे मिळणार 1 लाख

 

First published: February 15, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading