• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • स्कूल व्हॅनचा स्फोट होऊन लागली आग, 4 मुलांचा जळून मृत्यू

स्कूल व्हॅनचा स्फोट होऊन लागली आग, 4 मुलांचा जळून मृत्यू

या स्कूल व्हॅनमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागली. त्यावेळी या व्हॅनमध्ये 8 विद्यार्थी होते.

 • Share this:
  पंजाब, 15 फेब्रुवारी : पंजाबमधील संगरूरमध्ये लोंगोवालमध्ये एक अंगावर शहारे आणणारा अपघात घडला आहे. एका स्कूल व्हॅनमध्ये आग लागल्यामुळे 4 चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. 4 मुलांचा जळून मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहे. मिळलेल्या माहितीनुसार, सिद्धु रोडवरील लोंगोवाल इथून जात असताना अचानक  एका मारुती व्हॅनमध्ये स्फोट होऊन आग लागली. अवघ्या काही सेकंदात कारमध्ये आग पसरली. या स्कूल व्हॅनमध्ये पहिली आणि दुसऱ्या वर्गात शिकणारे विद्यार्थी होते. ही स्कूल व्हॅन सिमरन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी जात होती. त्याचवेळी हा अपघात घडला. या स्कूल व्हॅनमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागली. त्यावेळी या व्हॅनमध्ये 8 विद्यार्थी होते. घटनेनंतर स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. हा अपघात इतका भीषण होता की, यात चार मुलांचा जळून मृत्यू झाला.  परंतु, यातून 4 मुलांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. चारही जखमी मुलांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक उपचारानंतर  PGI हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच या चिमुरड्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयाच्या परिसरात कुटुंबीयांचा एकच आक्रोश पाहून उपस्थितीत लोकांच्या काळजाचं पाणी झालं. या दुर्दैवी अपघातातील मृत मुलांची ओळख झाली आहे. नवजोत कौर, सिमरनजीत कौर, राध्या रानी आणि कमलप्रीत कौर असं या चिमुरड्यांची नाव होती. या अपघातानंतर पोलिसांनी संबंधीत शाळेत चौकशी सुरू केली आहे. या स्कूल व्हॅनबद्दल सगळे रिपोर्ट मागवले आहे.  या अपघातानंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि व्हॅनचालक फरार झाले आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहे.
  Published by:sachin Salve
  First published: