तयारी ठेवा! ATM च्या वापरावर मोजावं लागणार ज्यादा शुल्क

तयारी ठेवा! ATM च्या वापरावर मोजावं लागणार ज्यादा शुल्क

ATM मधून पैसे काढताना आता ज्यादा शुल्क आपल्याला द्याव लागणार आहे. तशी मागणी ATM ऑपरेटर्स असोसिएशने RBI कडे केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी - भारतीय ATM ऑपरेटर्स असोसिएशनने रिझर्व बँक ऑफ इंडियाला (Reserve Bank of India) एक पत्र लिहिलं आहे. त्याद्वारे त्यांनी ATMमधून पैसे काढण्यावर इंटरचेंज शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे. ATM ऑपरेटर्स असोसिएशनचं म्हणणं आहे की, जर आरबीआयने या शुल्कवाढीला मंजुरी दिली नाही तर त्यांच्या व्यवसायावर याचा विपरित परिणाम होईल. खासकरून याचा परिणाम नवीन ATM मशिन बसवण्यावर होणार आहे. देशात ATM मशिनची संख्या वाढवण्यासाठी अजुनही प्रयत्न सुरू आहेत.

असोसिएशननं RBI ला पाठवलेल्या पत्रात लिहिलंय की, खर्च वाढला आणि महसूल तेवढाच राहिल्यामुळे फक्त ATM व्यवसायावर परिणाम होत होतोच आहे. शिवाय नव्या एटीएमच्या उभारणीला सुद्ध अडचणी येत आहेत.

ATM चालवण्याचा खर्च का वाढला - ATM ऑपरेटर्स असोसिएशनचं म्हणणं आहे की RBI ने ATM ची सुरक्षा आणि देखभालीच्या दर्जामध्ये वाढ केलीय. RBI च्या या निर्णयानंतर सर्व ATM मशिनची सुरक्षा आणि देखभालीचा खर्च पहिल्यापेक्षा वाढला आहे. याच्या उलट ATM ची सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे.

16 मार्चपासून बंद होणार ATM चे हे व्यवहार, हे आहे कारण

सध्या भारतीय रिझर्व बँकेकडून ATM मधील इंटरचेंज फी ही प्रति ट्राम्झॅक्शन 15 रुपये ठेवण्यात आलीय. हा चार्ज प्रति ग्राहक प्रति महिना 5 ट्रांझेक्शननंतर लागू होतो. याच चार्जबद्दल कॉनफेडरेशन ऑफ इंडियान इंडस्ट्री (CATMi) ने म्हटलं आहे की, ATM मशिनच्या डेली ऑपरेशनसाठी हे शुल्क पेरसं नाही.

RBI ने स्थापन केली समिती - या शुल्कवाढीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी RBI ने मागील वर्षी एका उच्चस्तरिय समितीची स्थापना केली आहे. देशभरातील ATM मशिनची संख्या कशी वाढवली जाईल आणि दुर्गम भागांमध्ये ATMची संख्या कशी वाढले याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या समितीने आपला रिपोर्ट RBI कडे सोपवला आहे. 6 सदस्यांच्या या समितीने केलेल्या शिफारसीनुसार इंटरचेंज फी वाढवण्यात यावी.

या तीन बँकांमध्ये खाती असतील तर आता भरावा लागणार कमी EMI, आजपासून नवा दर लागू

First published: February 15, 2020, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading