जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कर्मचारी कपातीनंतर Google चा मोठा निर्णय, कंपनीची कॉस्ट कटिंग मोहीम सुरूच

कर्मचारी कपातीनंतर Google चा मोठा निर्णय, कंपनीची कॉस्ट कटिंग मोहीम सुरूच

तुमच्या मोबाईलवर आहे गुगलची करडी नजर... 

तुमच्या मोबाईलवर आहे गुगलची करडी नजर... 

गुगलनं आता कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई: जगातील दिग्गज टेक कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या गुगलच्या कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना कठीण असू शकतो. कारण गुगलनं आता कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गुगलच्या चीफ फायनॅन्शियल ऑफिसर रुथ पोरॅट यांनी 31 मार्च 2023 रोजी गुगलच्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या मेमोमध्ये म्हटलं आहे की, ‘खर्च कमी करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून कंपनी आगामी काळात कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे विविध भत्ते कमी करेल.’ कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी सर्वोत्तम असणाऱ्या कंपनींपैकी गुगल एक समजली जाते. कारण ही कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना विविध सोयीसुविधा देते. वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते देते. मात्र, आता कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त देण्यात येणाऱ्या विविध भत्त्यांबाबत, सोयीसुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय कंपनीनं घेतलाय.

    SSC HSC Exam Result : कधी जाहीर होणार दहावी आणि बारावीचे निकाल? समोर आली महत्त्वाची माहिती

    गुगलनं काही अवाजवी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येथून पुढे मायक्रो किचन, लॉन्ड्री सेवा, मसाज आणि बिझनेस लंच या महत्त्वाच्या सुविधा किंवा त्यासाठीचे पर्क्स म्हणजे भत्ते कंपनीकडून कमी केले जातील, किंवा बंद करण्यात येतील. कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला मेमो बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, गुगलचे चीफ फायनॅन्शियल ऑफिसर रुथ पोरॅट यांनी मेमो मध्ये म्हटलंय की, ‘कंपनीला उच्च प्राधान्य कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निधीचा प्रभावीपणे वापर करणं गरजेचं आहे.’

    News18लोकमत
    News18लोकमत

    शुक्रवारी (31 मार्च 2023) पोरॅट यांनी गुगल कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये म्हटलं आहे की, ‘कंपनी उच्च प्राधान्य कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची गती कमी करेल, आणि गरजेनुसार टीममधील कर्मचाऱ्यांची विविध ऑफिसेसमध्ये बदली करून उच्च प्राधान्य कामाचा तोल सांभाळला जाईल.

    हालाखीच्या परिस्थितीवर केली मात, अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला वनाधिकारी, Video

    कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या लॅपटॉपसारख्या वैयक्तिक उपकरणांमध्ये गुंतवणूक करणं थांबवेल. पर्क अ‍ॅडजस्टमेंट ऑफिसच्या स्थानाच्या गरजा आणि प्रत्येक ऑफिस स्पेसमध्ये दिसलेल्या ट्रेंडच्या आधारावर बदलू शकतात.’ कर्मचाऱ्यांना न आवडणारा निर्णय? गुगल कंपनी कर्मचाऱ्यांना मिळणारा मोफत स्नॅक्स, लॉन्ड्री सेवा, मसाज आणि कंपनीच्या जेवणाच्या विस्तृत श्रेणीसाठी ओळखली जाते. ज्यामुळे ही कंपनी काम करण्यासाठी एक आदर्श ठिकाण समजली जाते. अनेक कर्मचाऱ्यांना गुगलच्या भत्त्यांचं आकर्षण आहे. त्यामुळे विविध भत्त्यांबाबत गुगल घेत असलेला निर्णय अनेक कर्मचाऱ्यांना आवडणार नाही. कंपनीसाठी निधीची बचत करणं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह उच्च प्राधान्य असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करणं, हे आवश्यक आहे. तसंच कंपनीचा खर्च कमी करण्याच्याच अनुषंगाने कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की, ‘गुगल कर्मचार्‍यांच्या संख्येमध्ये जागतिक स्तरावर सुमारे 6 टक्के कपात करणार आहे. जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांची कपात कंपनी करणार आहे. कंपनीची प्रतिभा आणि भांडवल आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह सर्वोच्च प्राधान्यांवर केंद्रित साठी असा निर्णय घेतला जातोय.’ त्यातच आता गुगलनं मायक्रो किचन, लॉन्ड्री सेवा, मसाज आणि बिझनेस लंच या महत्त्वपूर्ण सुविधा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रो किचन सुविधे किचनअंतर्गत कर्मचाऱ्यांना स्नॅक्सची सेवा मिळत असे. ज्या दिवसांमध्ये वापर कमी दिसतो, त्या दिवशी मायक्रो किचन बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार काही फिटनेस क्लासचे वेळापत्रक बदलण्याचा विचार गुगल करीत आहे. भत्त्यांमध्ये केली जाणारी कपात गुगल कर्मचार्‍यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल असल्यासारखे वाटत असले तरी कंपनीचा दावा आहे की, ही कपात बचत करण्यासाठी उपयुक्त ठरेल. याबाबत बोलताना गुगलचे प्रवक्ते रायन लॅमन यांनी गिझमोडोला सांगितलं, ‘आम्ही जाहीर केल्याप्रमाणे सुधारित वेग आणि कार्यक्षमतेद्वारे टिकाऊ बचत करण्याचं आमच्या कंपनीचं उद्दिष्ट आहे. याचाच एक भाग म्हणून, आम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून काही निर्णय घेत आहोत.’ दरम्यान, गुगलनं जागतिक स्तरावर जवळपास तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर खर्च कमी करण्यासाठी येत्या काही महिन्यांत हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा कंपनीला कितपत फायदा होईल? हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Google , money
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात