Home /News /videsh /

अमेरिकन सिनेटरना घेता येईना Google च्या CEO चं नाव; सुंदर पिचाई चा उच्चार काय केलाय पाहा...

अमेरिकन सिनेटरना घेता येईना Google च्या CEO चं नाव; सुंदर पिचाई चा उच्चार काय केलाय पाहा...

Schwarzenegger या आडनावाचा उच्चार आपल्याला करता येत नाही हे समजू शकतो, पण पिचाई या आडनावाचा उच्चार देखील करता येऊ नये? अमेरिकन (US senator) सिनेटर्सनी पिचाई (Sundar Pichai) यांच्या नावाचे इतके अजब उच्चार केले की Twitter वर टीकेची झोड उठली.

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर : अनेकदा आपल्या जोडाक्षर असलेल्या अवघड नावाचा, आडनावाचा उच्चार चुकीचा केल्याचा अनुभव तुम्हाला असेल. एखाद्याचं नाव किंवा आडनाव उच्चारण्यास अडचण येते. परंतु अतिशय सोप्या आडनावाचा उच्चार जर तुम्हाला करता आला नाही तर? Schwarzenegger या आडनावाचा उच्चार आपल्याला करता येत नाही हे समजू शकतो, पण पिचाई या आडनावाचा उच्चार देखील करता येऊ नये? अमेरिकेच्या सिनेटरला या Google चे CEO सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांचं आडनाव घेण्यात अडचण आली म्हणे. पिचाई यांच्या नावाचा उच्चार करता आला नाही, पण फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांच्या नावाचा उच्चार करताना त्यांची जीभ अडखळली नाही, अगदी सहज वळली. यावरून आता Twitter वर ट्रोलिंग आणि चर्चा रंगली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी (US elections 2020) कलम 230 च्या चर्चा आणि सुनावणीवेळी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर्सनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग, गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमांतून येणाऱ्या प्रक्षोभक प्रतिक्रिया, भाषणं, निवडणुकीबद्दलची चुकीची माहिती देणं आणि या कंटेंटचं मॉडरेशन करणं या विषयांवर प्रश्न विचारले. सिनेटर्सनी काही महत्वाच्या मुद्दे मांडले पण ते मांडताना काही चुका देखील केल्या. यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या आडनावाचा चुकीचा उच्चार ही एक महत्त्वाची चूक सर्वांच्या डोळ्यात भरली. मूळचे भारतातील तामिळनाडूच्या चेन्नईमधील असणारे सुंदर पिचाई  हे जगभरातील सर्वांत शक्तिशाली डिजिटल प्लॅटफॉर्मच्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. परंतु अमेरिकेच्या सिनेटर्सनी त्यांच्या आडनावाचा नीट उच्चार करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. भारतीय व्यक्तीला उच्चार करता येतो पण अमेरिकेच्या या सिनेटरने मात्र या नावाचे काहीतरीच अजब उच्चार केले. Pick-eye पिक आई हा त्यापैकी एक उच्चार. Buzzfeed मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, सिनेटच्या वाहतूक, विज्ञान आणि वाणिज्य समितीचे प्रमुख सिनेटर रॉजर विकर पहिल्यांदा पिचाई यांच्या नावाच्या उच्चाराची वाट लावली. ते म्हणाले, ‘मिस्टर पिक आई प्रस्तावना करतील.’ या सुनावणीला तास झाल्यानंतर सिनेटर अमी क्लोबुचर यांनी त्या नावाचं आणखी वाट्टोळं करत पि चेई असं म्हटलं, पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी बरोबर उच्चार केला. याबरोबर सुंदर पिचाई यांच्या नावाचा बरोबर उच्चार करणाऱ्या त्या पाहिल्या सिनेटर ठरल्या. त्याच्यानंतर मारिया कॅंटवेल, मार्शा ब्लॅकबर्न आणि माईक ली या सर्व सिनेटर्सनी पुन्हा एकदा त्यांच्या नावाचा चुकीचा उच्चार करत पिकाई असाच केला. त्यानंतर इंटरनेटवर यासंबंधी विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. अमेरिकी नागरिकांना ट्विट करत सिनेटर्सना शब्दांनी झोडायला सुरुवात केली. या सेक्शन 230 च्या सुनावणीला उपस्थित असणारे पिचाई हे एकटेच इमिग्रंट आणि पीओसी व्यक्ती होते. एकूणातच सर्व सिनेटर्सनी त्यांच्या आडनावाचा पुन्हा उच्चार करण्याच्या प्रयत्नही न करता छुप्या पद्धतीने जातीयवादाचं दर्शन घडवलं. झुकेरबर्ग हे नावदेखील उच्चारायला तितकंच अवघड होतं.एकानी त्याचा उच्चार चुकीचा केलाही पण त्यानं लगेच तो सुधारला. पण पिचाई यांचे पिकाई असे आडनाव एकाने म्हटल्यानंतर सगळ्यांनी तेच म्हणण्याची चूक केली. त्याचबरोबर कोणत्याही सिनेटरने यासाठी दिलगिरी व्यक्त केली नसून योग्य नाव काय आहे हे विचारण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. दरम्यान, पिचाई यांनी अमेरिकेत येताना किती अडचणी आल्या आणि भारताच्या वारशाबद्दल अनेकदा आपल्या भाषणांत या आधी सांगितलं आहे. 27 वर्षांपूर्वी स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी त्यांनी भारत सोडला होता. त्यांच्या त्यावेळी झालेल्या अडचणींची माहिती देताना त्यांनी एकदा आपल्या वडिलांना आपले अमेरिकेचे तिकीट काढण्यासाठी किती कष्ट करावे लागले होते हे देखील सांगितले होते. अमेरिकेचं तिकिट काढून देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी एका वर्षाचा पगार खर्च केल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. पण कॅलिफोर्नियामध्ये आल्यानंतर गोष्टी सोप्या नसल्याची जाणीव मला झाल्याचे देखील पिचाई यांनी म्हटले होते. त्यावेळी फोन करणे देखील खूप महाग होते. एक मिनिटाच्या फोन कॉलसाठी दोन अमेरिकन डॉलर खर्च येत होता. त्याचबरोबरच बॅकपॅकची किंमत माझ्या वडिलांच्या मासिक पगाराइतकी होती. कॅलिफोर्नियामध्ये उतरल्यानंतर येणाऱ्या परिस्थितीचा त्यांना अंदाज आला होता. सुंदर पिचाई यांचे संपूर्ण बालपण हे चेन्नईमध्ये गेले असून त्यांनी आयआयटीमधून आपले इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर मास्टर डिग्री त्यांनी स्टॅनफोर्ड विदयापीठातून आणि व्हार्टन स्कूलमधून एमबीए पूर्ण केलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Google, US elections

    पुढील बातम्या