जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Kim Jong Un यांना विसरले नाहीत डोनाल्ड ट्रम्प, आजही आहेत 'मित्रा'च्या संपर्कात?

Kim Jong Un यांना विसरले नाहीत डोनाल्ड ट्रम्प, आजही आहेत 'मित्रा'च्या संपर्कात?

Kim Jong Un यांना विसरले नाहीत डोनाल्ड ट्रम्प, आजही आहेत 'मित्रा'च्या संपर्कात?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (North Korean dictator Kim Jong Un) यांच्यातले चांगले संबंध अजूनही कायम आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    वॉशिंग्टन, 12 फेब्रुवारी: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (North Korean dictator Kim Jong Un) यांच्यातले चांगले संबंध अजूनही कायम आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहकाऱ्यांसोबत बोलताना व्हाइट हाउस सोडल्यानंतर ते उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या संपर्कात आहेत असं म्हटलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टर मॅगी हॅबरमनने (Maggie Haberman) ट्रम्प यांच्या हवाल्याने म्हटलं आहे, की ‘ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यातले संबंध अजूनही कायम आहेत.’ हॅबरमन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लिहिलेल्या ‘द कॉन्फिडन्स मॅन’ या पुस्तकात हा खुलासा केला आहे. हे पुस्तक 4 ऑक्टोबरला प्रकाशित होत आहे. ‘किम जोंग उन यांच्यासोबत पत्रांची देवाणघेवाण केल्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो,’ असं डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 च्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. ट्रम्प यांच्या या दाव्याची जगभरात चर्चा झाली होती; मात्र तीन वेळा भेटूनही ट्रम्प उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची क्षेपणास्त्र  आणि अणुबॉम्ब (Atomic bomb) सोडण्याबाबत समजूत काढण्यात अपयशी ठरले. ‘ट्रम्प यांच्या या दाव्याला पुष्टी मिळू शकत नाही आणि ती खरी असेलच असं नाही,’ असं मॅगी हॅबरमन यांनी सांगितलं. हे वाचा- पाकिस्तानमध्ये जवळच्या नातेवाईंकामध्ये लग्न करण्याने या आजाराचा वाढला धोका! एकमेव विदेशी नेता ज्यांच्याशी त्यांचा अजूनही संपर्क आहे मॅगी हॅबरमन यांनी सांगितलं, की, ‘ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, किम जोंग उन हे एकमेव विदेशी नेते आहेत, की ज्यांच्याशी त्यांचा अजूनही संपर्क आहे’, मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसनेदेखील (White House) यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. तसंच ट्रम्प यांच्या प्रतिनिधीनेही या दाव्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. हे वाचा- Ukraine Crisis: रशियाकडून हल्ल्याची भीती, अमेरिका युक्रेनमधील दूतावास रिकामी करणार, आणखी 3000 सैनिक पाठवणार यापूर्वी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे संपादक आणि शोध पत्रकार बॉब वुडवर्ड यांच्या ‘रेज’ या पुस्तकात ट्रम्प यांच्या हवाल्यानुसार दावा करण्यात आला आहे, की किम जोंग उन यांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या काकांच्या हत्येचा किस्सा सांगितला होता. 2013 मध्ये किम जोंगचे काका जांग सांग थायक हे उत्तर कोरियातल्या सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक होते. ‘किम हे मला सर्व काही सांगतात. त्यांनी मला प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. त्यांनी काकांची हत्या करून त्यांचा मृतदेह पायाजवळ ठेवला आणि नंतर छातीवर बसून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला,’ असं ट्रम्प यांनी पुस्तकाच्या लेखकाला सांगितल्याचं पुस्तकात लिहिलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात