जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Cousin Marriage in Pakistan: पाकिस्तानमध्ये जवळच्या नातेवाईंकामध्ये लग्न करण्याने 'या' आजाराचा वाढला धोका!

Cousin Marriage in Pakistan: पाकिस्तानमध्ये जवळच्या नातेवाईंकामध्ये लग्न करण्याने 'या' आजाराचा वाढला धोका!

Cousin Marriage in Pakistan: पाकिस्तानमध्ये जवळच्या नातेवाईंकामध्ये लग्न करण्याने 'या' आजाराचा वाढला धोका!

Cousin Marriage in Pakistan: पाकिस्तानातील काही शहरांमध्ये जवळच्या नात्यात विवाह करण्याची परंपरा आहे. अशा विवाहांमुळे मुलांमध्ये अनेक प्रकारचे जनुकीय आजार आढळून येत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 11 फेब्रुवारी : रक्तातील नात्यात लग्न करू नये असा सल्ला नेहमी दिला जातो. इस्लाममध्ये चुलत भाऊ, निलत भाऊ, चुलत बहीण यांच्याशी विवाह करण्याची परवानगी आहे. लग्नाची ही व्यवस्था पूर्णपणे ऐच्छिक असली तरी, पाकिस्तानातील काही शहरांमध्ये जवळच्या नातेवाइकांमध्ये लग्न करणे याला परंपरा म्हणून पाहिले जाते. जवळच्या नात्यातील विवाहाची परंपरा कोणत्याही एका धर्माशी किंवा केवळ पाकिस्तानशी संबंधित नाही. दक्षिण भारतीयांमध्येही जवळच्या नातेवाईकांशी लग्न करण्याची परंपरा आहे. या प्रथेमुळे जनुकीय विकारांची प्रकरणे वाढत असल्याचे अनेक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर्मनीच्या डीडब्ल्यू न्यूजने निकाहच्या या परंपरेने बांधलेल्या पाकिस्तानातील लोकांबद्दल सविस्तर अहवाल तयार केला आहे. या मुलाखतीत लोकांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणारे 56 वर्षीय गफूर हुसैन शाह आठ मुलांचे वडील आहेत. शाह म्हणाले की, येथील आदिवासी रितीरिवाजांनुसार त्यांनी आपल्या मुलांचे लग्न कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांशीच करणे अपेक्षित आहे. वास्तविक, अशा विवाहांमुळे जन्मलेल्या मुलांमध्ये जनुकीय आजाराचे धोके किती आहेत, याची शहा यांना चांगली जाणीव आहे. त्यांनी 1987 मध्ये त्यांच्या मामाच्या मुलीशी लग्न केले आणि त्यांची तीन मुले काही आरोग्याच्या विकारांशी झुंज देत आहेत. मुलींमध्ये जनुकीय आजार शाह यांनी DW ला सांगितले की त्यांच्या मुलाचा मेंदू सामान्य आकारात विकसित झालेला नाही. त्यांच्या एका मुलीला बोलण्यात अडचण येते तर दुसरीला नीट ऐकू येत नाही. ते म्हणाले, ‘मला सर्वात जास्त खंत आहे की ते शिक्षण घेऊ शकले नाही. मला त्यांची नेहमीच काळजी असते. मी आणि माझी पत्नी गेल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार.’ शहा यांनी सांगितले की, येथे चुलत भावात लग्नासाठी खूप सामाजिक दबाव आहे. नातेवाइकांमध्ये लग्न न केल्यामुळेही लोकांना समाजातून बहिष्कृत केले जाते. शाह यांनी सांगितले की, त्यांना त्यांचा एक मुलगा आणि दोन मुलींचे लग्न जवळच्या नातेवाईकांमध्ये करायचे होते. त्याच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासामध्ये रक्त विकार, शिकण्यात अक्षमता, अंधत्व आणि बहिरेपणा या समस्यांचा समावेश आहे. हे इनब्रीडिंगमुळे झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जोडीदारांपैकी एखाद्यामध्ये काही प्रकारचे अनुवांशिक रोग असल्यास जवळच्या नातेवाईकांसोबतच्या विवाहात समस्या उद्भवतात. समुदायामध्ये विवाह केल्याने जोडीदारामध्ये समान अनुवांशिक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी मुलाला जनुकांमध्ये दोन विकार होतात आणि त्याच्यात हा विकार होण्याची शक्यता वाढते. तर समाजाच्या बाहेर विवाह केल्यावर, जनुकांचा समूह मोठा होतो आणि मुलाला पालकांकडून समस्या वारशाने मिळण्याची शक्यता कमी असते. म्यूटेशनची समस्या पाकिस्तानमधील अनुवांशिक म्यूटेशन वरील 2017 चा अहवाल म्यूटेशनचे प्रकार आणि त्यांच्याशी संबंधित विकारांचा मागोवा घेतो. रिपोर्टच्या डेटाबेसनुसार, रक्ताच्या नात्यातील विवाहांमुळे पाकिस्तानमध्ये जनुकीय विकार वाढत आहेत. एका डेटाबेसनुसार, पाकिस्तानमध्ये आढळणाऱ्या 130 विविध प्रकारच्या जनुकीय विकारांमध्ये 1,000 हून अधिक म्यूटेशन आढळून आले आहेत. बालरोगतज्ञ हुमा अर्शद चीमा यांनी सांगितले की, इनब्रीडिंगमुळे पाकिस्तानमध्ये जनुकीय विकारांची (जनुकीय आजार) अनेक प्रकरणे आहेत. ते म्हणाले की काही विकार सहजपणे ओळखता येतात कारण ते केवळ विशिष्ट समुदाय आणि जमातींमध्ये आढळतात जेथे एंडोगॅमी सामान्य आहे. सध्या पाकिस्तानमध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे थॅलेसेमिया हा अनुवांशिक रक्त विकार आहे, जो लाल रक्तपेशींना ऑक्सिजन शोषण्यापासून प्रतिबंधित करतो. चीमा म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असे विकार ओळखण्यासाठी अनुवांशिक चाचणी किंवा विशेष तपासणीची सुविधा नाही. एवढेच नाही तर अनुवांशिक विकारांवर उपचारांचाही अभाव आहे. चुलत भावंडाचा विवाह स्वीकारण्याची सक्ती कराची-स्थित आरोग्य तज्ञ सेराज-उद-दौला म्हणतात की पाकिस्तानमध्ये चुलत भावाशी विवाह इस्लामिक धार्मिक तत्त्वांशी संबंधित आहे. ते म्हणाले, ‘मी मौलवींना अनुवांशिक आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करण्यास सांगितले. अशा विवाहांमुळे अनुवांशिक रोग कसे वाढतात हे मी लोकांना सांगायला सांगितले. मौलवींनी हे विवाह इस्लामिक शरिया कायद्यानुसार आणि प्रेषित मुहम्मद यांच्या परंपरेनुसार होत असल्याचे सांगत असे करण्यास ठामपणे नकार दिला. शाह म्हणाले की, पाकिस्तानातील अनेक कुटुंबांमध्ये असे विवाह होतात. कारण त्यांचा असा विश्वास आहे की इस्लाममध्ये असेच घडते. सरकारने असे विवाह बेकायदेशीर ठरवले तरी त्याला तीव्र विरोध केला जाईल. पाकिस्तानच्या काही भागात आदिवासी आणि जातिव्यवस्थेची मुळे खूप खोलवर आहेत. चीमा म्हणाले की, जातिव्यवस्था, विशेषत: पंजाब प्रांतात राहणाऱ्या लोकांमध्ये, अतिशय कठोर आहे जिथे फक्त आंतर-कौटुंबिक विवाह होतात. ते म्हणाले की, या समाजात अनेक जनुकीय विकार सर्रास आढळतात. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील बलुचिस्तान प्रांत, सिंधचा दक्षिणेकडील प्रदेश आणि उत्तर-पश्चिम प्रांतांमध्ये आदिवासी व्यवस्था इतकी मजबूत आहे की इथले कौटुंबिक जीवन त्यांचे पालन करते. बलुचिस्तानमधील रहिवासी गुलाम हुसैन बलोच यांनी सांगितले की, त्यांच्या कुळाबाहेर लग्न करण्यास बंदी आहे. सिंधमधली परिस्थितीही फार वेगळी नाही, जिथे कुळाबाहेर लग्न केल्यास मारामारी आणि मारणे हे सर्रास आहे. आरोग्य तज्ज्ञांचे मत बालरोगतज्ज्ञ चीमा सांगतात की, बाळाला जन्म देण्यापूर्वी त्याची तपासणी केली पाहिजे. याच्या मदतीने कोणत्याही प्रकारचा विकार अगोदरच ओळखता येतो. हे पालकांना गर्भधारणेसाठी पुढे जायचे की नाही हे ठरवण्यास मदत करेल. या विकाराने जन्मलेल्या मुलाच्या उपचारातही लवकर तपासणी मदत करू शकते. त्याच वेळी, आरोग्य तज्ज्ञ दौला म्हणाले, ‘जवळच्या कुटुंबातील सदस्यांपासून मुलांना होणाऱ्या धोक्याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. पण लोकांची धार्मिक बाबींवर अंधश्रद्धा आहे. त्यांना कोणताही वाद ऐकायचा नाही. marriage age of women from 18 to 21 लॅन्सेट अभ्यास काय म्हणतो? रक्ताच्या नात्यात लग्न केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा विवाहांतून जन्माला आलेल्या बहुतेक मुलांना जन्मजात समस्या आढळून येतात. लॅन्सेटच्या अभ्यासानुसार, या लोकांच्या मुलांना सर्वात जास्त हृदयाशी संबंधित समस्या असतात. यानंतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि पूर्णपणे विकसित न होणे अशा समस्याही येतात. संशोधकांच्या मते, खराब जीवनशैली, धूम्रपान आणि जास्त मद्यपान या कारणांमुळेही या समस्या उद्भवू शकतात. पण एकाच कुटुंबात लग्न केल्यावर ही समस्या अधिक दिसून येते. केवळ इस्लाम किंवा पाकिस्तानबद्दलच नाही तर.. जवळच्या नातेवाईकाशी लग्न करण्याची परंपरा फक्त इस्लाम किंवा पाकिस्तानमध्येच आहे असे नाही. जेरुसलेममधील अरब, पारशी आणि अगदी दक्षिण भारतीयांमध्येही जवळच्या नातेवाईकांमध्ये विवाह करण्याची परंपरा आहे. दक्षिण भारतात असे अनेक समुदाय आहेत जे जवळच्या नातेवाईकांशी लग्न करतात. तेथे गोत्र (वडिलोपार्जित वंश) गांभीर्याने घेतले जाते आणि त्यात लग्न केले जात नाही. म्हणजेच एकाच गोत्रातील पुरुष व स्त्री यांच्यात विवाह होत नाही. भाऊ आपल्या बहिणीशी लग्न करू शकत नाही. परंतु, तो आपल्या चुलत बहिणीशी विवाह करू शकतो. तसेच मामा-भाचीची लग्नेही इथे होऊ शकतात आणि होतात. गोत्रम प्रणाली अनुवांशिक अंतर राखते असे मानले जाते आणि एंडोगॅमीच्या दृष्टिकोनातून देखील सुरक्षित मानले जाते. येथे अनुवांशिक अंतर खऱ्या भावंडांपेक्षा थोडेसे मोठे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात