नवी दिल्ली, 23 मार्च : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील (Russia Ukraine War) अनेक लोक देश सोडून इतर युरोपीय देशांमध्ये जात आहेत. याच युद्धाच्या परिस्थितीत हंगेरीतील रिफ्यूजी बॉर्डरवर एक ग्लॅमरस महिला पोहोचली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला तिच्याकडे असलेल्या सूटकेसमध्ये तब्बल 2.2 अब्ज रुपये घेऊन या बॉर्डरवर आढळली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली. इतक्या मोठ्या रकमेसह आलेली ही महिला युक्रेनमधील एका बड्या व्यवसायिक आणि राजकीय व्यक्तीची पत्नी असल्याची माहिती आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, महिलेकडे आढळलेले पैसे डॉलर आणि युरोमध्ये आहेत. हंगेरीतील (Hungary) कस्टम डिपार्टमेंटने या महिलेला ताब्यात घेतलं आहे. विवादात असलेले युक्रेनचे माजी खासदार इगोर कोटवित्स्की यांची पत्नी अनास्तासिया कोटवित्स्की यांच्या सामानासह हे पैसे मिळाले आहेत. सोशल मीडियावर याचा फोटोही व्हायरल होतो आहे. युक्रेनच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, माजी खासदाराच्या पत्नीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकेकाळी कोटवित्स्की हे युक्रेनमधील सर्वात श्रीमंत खासदार होते. कोटवित्स्की यांनी आपल्या पत्नीच्या सूटकेटमध्ये 2.2 अब्ज रुपये आढळ्याचा अहवाल फेटाळला आहे.
हे वाचा - आज भारताला सलाम करतो..! पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही आले ताळ्यावर, भरसभेत म्हणाले..
त्यांची पत्नी आई होणार असून म्हणूनच ती देश सोडून चालली असल्याचं ते म्हणाले. पण पत्नीकडे इतकी मोठी रक्कम असल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं आहे. तसंच माझे सर्व पैसे युक्रेनमधील बँकांमध्ये जमा आहेत. मी कोणतेही पैसे काढले नसल्याचं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपलं सोशल मीडिया अकाउंट बंद केलं आहे. त्यांची पत्नी अनास्तासियाकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.
She knew precisely where to flee to. The wife of former Ukrainian MP Ihor Kotvitskyi declared 28 millionUSD and 1.3 million euros when entering Hungary. Kotvitskyi has faced allegations of corruption in the past. Confiscation of the money and redistribution would be a good start. pic.twitter.com/Eu1SSPErl6
— ThaiMythbuster (@thaimythbuster) March 21, 2022
हे वाचा - Ukraine Russia War: पुतिन यांना अन्नातून विष दिलं जाण्याची भीती.. 1000 वैयक्तिक कर्मचाऱ्यांना हटवलं
युक्रेनमधील चेक पॉइंटवर अनास्तासिया यांनी पैशांची कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. परंतु हंगेरीतील कस्टम अधिकाऱ्यांना त्याकडे मोठी रक्कम आढळली. आता युक्रेनमध्ये त्या चेक पॉइंटवर असलेल्या गार्ड्सवर कारवाई होण्याची माहिती समोर येत आहे. त्या गार्ड्सने लाच घेऊन पैसे देशाबाहेर जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.