कराची 28 ऑगस्ट : पाकिस्तानच्या अनेक भागात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत, तर हजारो लोक मरण पावले आहेत. लोक घर सोडून इकडे तिकडे भटकत आहेत आणि निवारा शोधत आहेत. दरम्यान, पाकिस्तान सरकारने पूरग्रस्त भागात लोकांच्या सुटकेसाठी लष्कर पाठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी लष्करालाही लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे.
..तर 5 हजार दंड, भारत-पाकिस्तान सामन्यावरुन NIT श्रीनगरचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा
अशीच एक घटना सिंध प्रांतात घडली, जेव्हा पाकिस्तानी सैन्य पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचलं. इथल्या संतप्त लोकांनी पाक लष्कराच्या जवानांना धक्काबुक्की करून हुसकावून लावलं. लोकांनी सांगितलं की, हे लोक मदतीसाठी नाही तर फोटो काढण्यासाठी आले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
سندھ میں فوج سیلاب متاثریں کی مدد کے نام پر ڈرامہ بازی کرنے اور فوٹو نکال کر میڈیا میں یہ تاثر دینے کی کوشش کرے گی کے فوج سندھی قوم کی مدد کر رہی ہے جہاں بھی فوج اس طرح کی ڈرامہ بازی کرنے آئے سندھ کے لوگ ان کو جوتے مار کر وہاں سے بھگائیں. pic.twitter.com/XvEkq7kGvY
— Shafi Burfat (@shafiburfat) August 27, 2022
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जेई सिंध मुत्तहिदा महज (JSMM) या सिंध राजकीय पक्षाचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष शफी मुहम्मद बर्फत यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लोक 'फौज को मारो' असे ओरडताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये काही लोक लष्कराच्या जवानांशी झटापट करताना दिसत आहेत. शफी मुहम्मद यांनी व्हिडिओ ट्विट करून लिहिलं की, सिंधमधील लष्कर पूरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली नाटक करण्याचा प्रयत्न करेल, फोटो काढेल आणि सैन्य सिंधी राष्ट्राला मदत करत असल्याचा मीडियामध्ये आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. जिथे जिथे सैन्य असं नाटक करायला येतं तिथे सिंधचे लोक त्यांना चोख प्रत्युत्तर देतात.
१५०० कुटुंबाचं वीज आणि गॅस कनेक्शन बंद! ट्विन टॉवर्स भागातील वाचा अपडेट्स
पुरामुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत बरंच नुकसान झालं आहे. पुरामुळे 300 मुलांसह सुमारे 1000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बलुचिस्तान आणि सिंधमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. शुक्रवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये तात्काळ प्रभावाने आणीबाणी घोषित करण्यात आली, जी 30 ऑगस्टपर्यंत लागू राहील. एनडीएमएच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये ऑगस्टमध्ये 166.8 मिमी पाऊस पडला, जो या कालावधीतील 48 मिमीच्या सरासरीपेक्षा 241 टक्के जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video, Pakistan