मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /..तर 5 हजार दंड, भारत-पाकिस्तान सामन्यावरुन NIT श्रीनगरचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा

..तर 5 हजार दंड, भारत-पाकिस्तान सामन्यावरुन NIT श्रीनगरचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा

विराट आणि बाबर आझम सरावावेळी

विराट आणि बाबर आझम सरावावेळी

Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान संघांमधला महामुकाबला आता अवघ्या काही तासांवर आलाय. यादरम्यान एनआयटी श्रीनगरने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

श्रीनगर, 27 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या महामुकाबल्याला आता अवघे काही तास उरले आहेत. आशिया चषकात हे दोन्ही संघ 28 ऑगस्टच्या संध्याकाळी आमनेसामने येणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच उभय संघांमध्ये हा सामना होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांचा सध्या दुबईत कसून सराव सुरु आहे. दुसरीकडे भारत विरुद्ध पाकिस्तान हा फक्त सामना किंवा एक खेळ नाही तर तो देशप्रेमापर्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची आतूरता मोठी असते. अनेकदा या सामन्यामुळे देशात वादही झाले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर एनआयटी श्रीनगरने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध केली आहे.

काय आहे नोटीस?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये उद्या रविवारी 28 ऑगस्टला सामना होणार आहे. यावेळी जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर एनआयटी या सरकारी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी एक नोटीस प्रसिद्ध केली आहे. यात भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची शिस्त मोडू नये असे निर्देश देण्यात आले आहे. तर कोणत्याही विद्यार्थ्याने नियमांचे उल्लघन केल्यास 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सामना संपल्यानंतर किंवा नंतर वसतिगृह/खोल्यांमधून बाहेर न पडण्याचेही सक्त आदेश देण्यात आलेत.

भारताचं पारडं जड

27 ऑगस्टपासून आशिया कपची सुरुवात UAE मध्ये होणार आहे. क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान आतापर्यंत 9 वेळा एकमेकांशी मैदानात भिडले आहेत. त्यापैकी 7 सामने भारताने जिंकले आहेत. पाकिस्तान केवळ दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला.

वाचा - भारत की पाकिस्तान… आशियातली सर्वात यशस्वी टीम कोणती?

आशिया चषकातले स्टार आमनेसामने

दरम्यान कालच्या सरावावेळीही दोन्ही संघातल्या खेळाडूंची भेट झाली होती. सरावानंतर मैदानाबाहेर हे खेळाडू चर्चा करताना दिसले. त्यात भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफसह पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या खेळाडूंचाही समावेश होता. इतकच नव्हे तर विराटसह इतर भारतीय खेळाडूंनी दुखापतग्रस्त शाहीन आफ्रिदीचीही विचारपूस केली. यावेळी विराट आणि बाबर आझमचीही भेट झाली होती.

कुठे खेळवला जाणार सामना?

दुबुई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे.

कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना?

UAE मध्ये हा सामना असणार आहे. २८ ऑगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरू होईल. ७ वाजता टॉस होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे असणार?

तुम्ही या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर पाहू शकता

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs Pakistan