Home /News /videsh /

विमान अपघाताचं सत्य आलं समोर.. पायलटने कॉकपिटमध्ये पेटवली सिगारेट अन् 66 जण जीवाला मुकले

विमान अपघाताचं सत्य आलं समोर.. पायलटने कॉकपिटमध्ये पेटवली सिगारेट अन् 66 जण जीवाला मुकले

क्रेडिट - unsplash

क्रेडिट - unsplash

अधिकृत तपासात पायलट मोहम्मद सईद अली शौकैर यांनी धूम्रपान करण्यासाठी विमानात सिगारेट पेटवल्यामुळे हा अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे. एव्हिएशन एक्सपर्ट्सच्या 134 पानांच्या अहवालात म्हटलं आहे की, तो सहसा पायलटच्या कॉकपिटमध्ये सिगारेट ओढत असे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 27 एप्रिल : फ्रान्समधील पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळावरून (Charles de Gaulle Airport Paris France ) कैरोला (इजिप्तची राजधानी) जाणारं विमान (Airbus) A320 मे 2016 मध्ये क्रॅश (Airplane crash) झालं होतं. हे विमान गूढ परिस्थितीत भूमध्य समुद्रात पडलं होतं. मृतांमध्ये 1 ब्रिटिश, 12 फ्रेंच पर्यटक, 30 इजिप्शियन, दोन इराकी आणि कॅनडाचे नागरिक होते. या प्रकरणाचा उलगडा झाला असून विमान कशामुळे कोसळलं हे अधिकृतरीत्या समजलं आहे. पायलटने सिगारेट ओढल्याने विमानातील सर्व 66 जणांचा मृत्यू झाला. तपासात ही बाब समोर आली आहे. दरम्यान याच वेळी, विमानाच्या इमर्जन्सी मास्कमधून ऑक्सिजन गळत होता. त्यानंतर पायलटने सिगारेट पेटवताच उडणाऱ्या विमानाच्या कॉकपिटमध्ये आग लागली. अपघाताचं कारण शोधण्यासाठी अपघातानंतर विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर ब्लॅक बॉक्स अमेरिकेच्या नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला. तो ग्रीसजवळ खोल पाण्यात होता. त्यानंतर इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी विमान अपघातामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचं सांगितलं होतं. हे वाचा - किळसवाणं! तब्बल 30 वर्ष रेस्टॉरंटच्या टॉयलेटमध्ये बनवत होते समोसे आणि स्नॅक्स मात्र, आता अधिकृत तपासात पायलट मोहम्मद सईद अली शौकैर यांनी धूम्रपान करण्यासाठी विमानात सिगारेट पेटवल्यामुळे हा अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे. एव्हिएशन एक्सपर्ट्सच्या 134 पानांच्या अहवालात म्हटलं आहे की, तो सहसा पायलटच्या कॉकपिटमध्ये सिगारेट ओढत असे. विशेष म्हणजे 2016 च्या अपघाताच्या वेळी विमानात सिगारेट ओढण्यावर बंदी नव्हती. हे वाचा - Karachi Bomb Blast मागे महिलेचा हात; आत्मघातकी हल्ल्याचा VIDEO इटालियन वृत्तपत्र Corriere Della Sera शी केलेल्या संभाषणात, तज्ज्ञांनी सांगितलं की, देखभाल इंजिनिअरिंगने ऑक्सिजन मास्क सामान्यवरून इमर्जन्सीमध्ये शिफ्ट केला होता. त्यामुळे ऑक्सिजनची गळती सुरू झाली. अहवालानुसार, 19 मे 2016 रोजी पहाटे 2.25 वाजता ऑक्सिजन गळतीचा आवाज येऊ लागला. याच्या काही मिनिटांनी विमान क्रॅश झालं.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Airplane, Crash, France

    पुढील बातम्या