मराठी बातम्या /बातम्या /विदेश /युक्रेनच्या हवाई हल्ल्यात रशियाच्या ऑईल डेपोला आग, भारताला इंधन तुटवडा जाणवणार का?

युक्रेनच्या हवाई हल्ल्यात रशियाच्या ऑईल डेपोला आग, भारताला इंधन तुटवडा जाणवणार का?

Russia-Ukraine War: NATO तज्ज्ञ थॉमस सी थेनर यांनी ट्विट केलंय, "द्रुझबा तेल पाइपलाइन पंपाला आग लागल्यास, युरोपमधील रशियाची एकमेव तेल पाइपलाइन नष्ट होईल. म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरीला आता रशियन तेल मिळणार नाही.

Russia-Ukraine War: NATO तज्ज्ञ थॉमस सी थेनर यांनी ट्विट केलंय, "द्रुझबा तेल पाइपलाइन पंपाला आग लागल्यास, युरोपमधील रशियाची एकमेव तेल पाइपलाइन नष्ट होईल. म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरीला आता रशियन तेल मिळणार नाही.

Russia-Ukraine War: NATO तज्ज्ञ थॉमस सी थेनर यांनी ट्विट केलंय, "द्रुझबा तेल पाइपलाइन पंपाला आग लागल्यास, युरोपमधील रशियाची एकमेव तेल पाइपलाइन नष्ट होईल. म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरीला आता रशियन तेल मिळणार नाही.

मॉस्को, 26 एप्रिल : रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) 2 महिन्यांहून अधिक कालावधी होत आहे. परंतु, युद्ध संपण्याऐवजी वाढतच आहे. दरम्यान, सोमवारी युक्रेनने रशियाच्या ब्रियांस्क शहरावर हल्ला केला. युक्रेनच्या सैन्यानं क्षेपणास्त्रं डागून एक तेल डेपो (oil depot) नष्ट केला आहे. आगीचे लोट आणि धुराचे लोट पाहून आगीची तीव्रता लक्षात येते. स्फोटानंतर (Russia blast) उसळलेल्या ज्वाला ज्वालामुखीसारख्या दिसत आहेत.

रशियाच्या ऊर्जा मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय की, सोमवारच्या आगीत ब्रियान्स्कमधील डिझेल इंधन डेपोचं नुकसान झालं आहे. अधिकारी या घटनेच्या परिणामांचा शोध घेत आहेत. देशाच्या पश्चिम भागात असलेल्या तेल डेपोला लागलेल्या भीषण आगीमुळे इंधनाचा तुटवडा भासणार नाही, असं ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.

हे वाचा - रशियासाठी मारियुपोलवरील विजय का आहे महत्त्वाचा? पुतिननी याला का म्हटलंय 'मुक्ती'

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना इंधन पुरवठ्यात व्यत्यय आलेला नाही आणि या प्रदेशात 15 दिवस पुरेसं डिझेल इंधन आहे. तेल डेपोची मालकी Transneft-Druzhba, राज्य-चालित Transneft ची उपकंपनी आहे. ती युरोपला कच्चे तेल घेऊन जाणारी Druzhba (मैत्री) पाइपलाइन चालवते.

रशिया तेल डेपोला लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीला कमी लेखत असला तरी अमेरिकेची मित्र राष्ट्रे नाटोला ते मान्य नाही. NATO तज्ज्ञ थॉमस सी थेनर यांनी ट्विट केलंय, "द्रुझबा तेल पाइपलाइन पंपाला आग लागल्यास, युरोपमधील रशियाची एकमेव तेल पाइपलाइन नष्ट होईल. म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरीला आता रशियन तेल मिळणार नाही.

द्रुझबा पाइपलाइन 5 हजार 500 किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. ती सायबेरिया, उरल आणि कॅस्पियन समुद्रातील अनेक युरोपीयन देशांना कच्चे तेल पाठवते. पाइपलाइन बेलारूसमधील मोझियरमधून जाते, जिथे ती उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील शाखांमध्ये विभाजित होते.

हे वाचा - झोप झालीय इतकी महाग! एक महिना झोप काढण्याचे मिळणार 26 हजार रुपये..

उत्तरेकडील शाखा बेलारूस आणि पोलंडमधून जर्मनीपर्यंत जाते. दक्षिणेकडील शाखा युक्रेनमधून जाते. नंतर स्लोव्हाकिया, झेक प्रजासत्ताक आणि हंगेरीला विविध मार्गांनी तेलाचा पुरवठा केला जातो. या पाइपलाइनद्वारे दररोज 1.2-1.4 दशलक्ष बॅरल तेल पाठवलं जातं.

रशियातल्या कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी सुमारे 70 टक्के ते 85 टक्के बाल्टिक समुद्र आणि काळ्या समुद्रावरील पश्चिम बंदरांमधून केली जाते. युरोपमध्ये बहुतेक तेल आयात टँकर आणि बंदरांमधून केली जाते.

First published:

Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news