मराठी बातम्या /बातम्या /Viral /

झोप झालीय इतकी महाग! एक महिना झोप काढण्याचे मिळणार 26 हजार रुपये..

झोप झालीय इतकी महाग! एक महिना झोप काढण्याचे मिळणार 26 हजार रुपये..

Dream Job : मलाया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासाशी संबंधित एक पोस्टर व्हायरल होत आहे. कारण, त्यात स्पष्टपणे लिहिलंय की, त्यांच्या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना फक्त झोप घेण्याचं काम करावं लागतं आणि दुसरं काही करायचं नाही.

Dream Job : मलाया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासाशी संबंधित एक पोस्टर व्हायरल होत आहे. कारण, त्यात स्पष्टपणे लिहिलंय की, त्यांच्या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना फक्त झोप घेण्याचं काम करावं लागतं आणि दुसरं काही करायचं नाही.

Dream Job : मलाया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासाशी संबंधित एक पोस्टर व्हायरल होत आहे. कारण, त्यात स्पष्टपणे लिहिलंय की, त्यांच्या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना फक्त झोप घेण्याचं काम करावं लागतं आणि दुसरं काही करायचं नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Digital Desk

नवी दिल्ली, 24 एप्रिल : नवी दिल्ली, 24 एप्रिल : मस्त डाराडूर झोप काढणं कुणाला आवडत नाही? बहुतेक लोकांचा सुट्टीच्या दिवशी हाच कार्यक्रम असतो. एवढ्या चांगल्या झोपेसाठी कोणीही आपल्याला पैसे देत नसतं. तरीही झोप सर्वांनाच प्रिय असते. पण तुम्हाला अशा 'निद्रासना'साठी पैसे देण्याची खरंच कोणी ऑफर दिली तर? अनेकांना वाटू शकतं की हा ड्रीम जॉब (dream job) आहे पण फक्त स्वप्नातच मिळू शकणारा! तर काहींना हा जॉब मिळाल्याची स्वप्नंही जागेपणीच पडू लागतील.

अलीकडेच अशीच आरामात झोप काढण्यासाठी महिन्याला तब्बल 26 हजार रुपये मिळत असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या 'झोप घेणाऱ्या उमेदवारां'साठी पात्रताही होती. केवळ पात्र उमेदवारालाच या 'कामा'चे पैसे मिळणार होते. अर्थातच, हा जाहिरातीवर लोकांच्या उड्या पडल्या.

मलाया विद्यापीठाच्या (University Of Malaya) काही संशोधकांनी खास झोपाळू आणि आळशी लोकांना एक ऑफर दिली. ते त्यांच्या संशोधनात सहभागी होणाऱ्या लोकांना फक्त झोप काढण्याचं बक्षीस म्हणून 26 हजार रुपये (26,500 Rs for Seeping) देत आहेत. यापेक्षा चांगली ऑफर आणखी काय असू शकते?

मलाया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासाशी संबंधित एक पोस्टर व्हायरल होत आहे. कारण, त्यात स्पष्टपणे लिहिलंय की, त्यांच्या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना फक्त झोप घेण्याचं काम करावं लागतं आणि दुसरं काही करायचं नाही. त्या बदल्यात, त्याला मलेशियन चलनात 1,500 मिळतील, जे भारतीय चलनानुसार 26,500 रुपये आहेत.  (Researchers paying participants for sleeping)

हे वाचा - भंगार बसला या माणसानं बनवलं Dream Place, आता गर्लफ्रेंडसोबत साजरी करतो सुट्टी!

20 ते 40 वयोगटातील लोकांसाठी ऑफर

या अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांसाठी काही पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सहभागींचे वय 20 ते 40 च्या दरम्यान असावं आणि त्यांचं वजन सरासरी असावं. याचं कारण म्हणजे त्यांना खास स्लीप हाऊस बॅगमध्ये (sleep house bag) झोपावं लागतं. अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना महिनाभर घरी झोपावं लागेल आणि त्यांची देखरेख केली जाईल. झोपेची कोणतीही वेगळी स्थिती आढळल्यास, सहभागींना त्यात समाविष्ट केलं जाणार नाही. वर्ल्ड ऑफ बझच्या मिस सैफाच्या मते, स्वयंसेवकांना स्लीपींग हाऊसमध्ये पाठवण्यापूर्वी त्यांची तपासणी (screening) केली जाईल. त्यानंतरच त्यांना त्यात समाविष्ट केलं जाईल.

हे वाचा - ऑस्कर थप्पड प्रकारानंतर Will Smith मुंबईत, सोबत साधू महाराज दिसल्यानं चर्चा

30 रात्रीच्या झोपेसाठी 26 हजार 500 रुपये

एकदा ते स्क्रिनिंग पास झाल्यानंतर, लोकांना स्लीपींग हाऊसमध्ये झोपण्यासाठी पाठवलं जाईल. त्यांना 30 रात्री झोपावं लागणार असून त्याबदल्यात त्यांना 26 हजार 500 रुपये मिळतील. संशोधकांनी त्याची जाहिरात करताच, इंटरनेटवर लोक या जाहिरातीवर तुटून पडले. परिस्थिती अशी बनली की, जाहिरात व्हायरल झाल्यानंतर संशोधकांना त्यांची नोंदणी थांबवावी लागली. 2017 मध्येही फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस मेडिसिन अँड सायकॉलॉजीने, लोकांना अशाच पद्धतीने 3 महिने बेडवर झोपण्यासाठी 11.2 लाख रुपये ऑफर केले होते.

First published:

Tags: Research, Salary, Sleep