Home /News /videsh /

ते एक विधान भोवलं; पाकिस्तानात मुख्याध्यापिकेला फाशीची शिक्षा, काय आहे प्रकरण?

ते एक विधान भोवलं; पाकिस्तानात मुख्याध्यापिकेला फाशीची शिक्षा, काय आहे प्रकरण?

महिलेने प्रेषित मुहम्मदला (Prophet Muhammad) इस्लामचा शेवटचा पैगंबर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता आणि स्वतःला इस्लामचा पैगंबर म्हणवून घेतले होते.

    इस्लामाबाद 29 सप्टेंबर : पाकिस्तानात (Pakistan) ईशनिंदेच्या (Blasphemy) नावाखाली एका शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेला (School Principal) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय न्यायालयाने महिलेला 5000 रुपये दंडही ठोठावला आहे. 2013 च्या या प्रकरणात मुख्याध्यापिकेला दोषी ठरवण्यात आले आहे. महिलेने प्रेषित मुहम्मदला (Prophet Muhammad) इस्लामचा शेवटचा पैगंबर म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता आणि स्वतःला इस्लामचा पैगंबर म्हणवून घेतले होते. एका स्थानिक मौलवीने या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला होता, ज्यावर आता निर्णय आला आहे. एका बिस्किटाने बदललं महिलेचं आयुष्य; बेरोजगार होती, पण आता झाली कोट्यवधी! लाहोरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निश्तर कॉलनीतील एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिका सलमा तन्वीरला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश मन्सूर अहमद यांनी आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, प्रेषित मुहम्मद (Prophet Muhammad) यांना इस्लामचा शेवटचा पैगंबर न मानून तन्वीरने त्यांची निंदा केली. तन्वीरचे वकील मुहम्मद रमजान यांनी असा युक्तिवाद केला होता, की तन्वीरची मानसिक स्थिती ठीक नाही आणि कोर्टाने त्याकडे लक्ष द्यावे, पण न्यायालयाने नकार दिला. मौलवीच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या वैद्यकीय मंडळाचा अहवाल (Medical Report) न्यायालयात सादर केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की आरोपी महिला फीट आहे आणि तिची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक आहे. या आधारावर न्यायालयाने महिलेच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळला. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा संबंधी कायदे खूप कडक आहेत. विशेषत: हे कायदे अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी वापरले जातात. अमेरिकेत तुटला 246 वर्षांचा इतिहास, शीख नौदल अधिकाऱ्याला पगडी घालण्याची परवानगी हुकूमशहा झिया-उल-हक (Ziaul Haq) यांच्या काळात पाकिस्तानात ईशनिंदा कायदा लागू करण्यात आला. ईशनिंदाच्या आरोपाखाली मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्यासह शेकडो लोक पाकिस्तानी तुरुंगात आहेत. 1987 पासून 1500 लोकांवर या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 2010 मध्ये, एका महिलेला शेजाऱ्यांशी झालेल्या वादावरून इस्लामचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि तिला आठ वर्षे कोठडीत ठेवण्यात आले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Pakistan, Viral news

    पुढील बातम्या