• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • एका बिस्किटाने बदललं महिलेचं आयुष्य; बेरोजगार होती, पण आता झाली कोट्यवधी!

एका बिस्किटाने बदललं महिलेचं आयुष्य; बेरोजगार होती, पण आता झाली कोट्यवधी!

तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, की तिच्यापुढचे सर्व रस्ते बंद झाले. आयुष्यात नक्की काय करायचं या चिंतेत ती पडली; पण एका बिस्किटाने (biscuit) तिला आयुष्याचा पुढचा रस्ता दाखवला.

 • Share this:
  प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही विचित्र घडामोडी घडत असतात. आयुष्यात कुणाचीही परिस्थिती एकसारखी राहत नसते. बदल हा ठरलेलाच असतो; पण बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या आयुष्यात काय करावं हे कळत नसतं. आपल्याला आयुष्यात काहीच मार्ग दिसत नाही; मात्र या कठीण काळात आपल्या आयुष्यात घडलेल्या काही घटना ह्या देवाने दिलेले एक प्रकारचे संकेतच असतात. ज्याला हे संकेत समजतात तो त्याचा फायदा करून घेतो. यातून आपल्याला आपल्या आयुष्याची एक दिशाच मिळते. अनेकदा यातून पूर्ण आयुष्यच बदलून जातं. अमांडा (Amanda) नावाच्या महिलेच्या (woman) बाबतीतही असंच घडलं. तिच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, की तिच्यापुढचे सर्व रस्ते बंद झाले. आयुष्यात नक्की काय करायचं या चिंतेत ती पडली; पण एका बिस्किटाने (biscuit) तिला आयुष्याचा पुढचा रस्ता दाखवला. अमांडाने आपल्या आयुष्यातली गोष्ट @someonefromthe80s नावाच्या TikTok (TikTok) अकाउंटवरून शेअर केली. यामध्ये एका फॉर्च्युन कुकीने (fortune cookie - बिस्कीट) तिच्या आयुष्याला दिशा कशी मिळाली आणि ती लक्षाधीश कशी झाली, याची माहिती अमांडाने दिली. जेव्हा तिला हे बिस्किट मिळालं, तेव्हा तिची नोकरी गेली होती आणि पुढं काय करावं हे तिला समजत नव्हतं; मात्र बिस्किट हातात आल्यानंतर तिला आपल्या जगण्याचा मार्ग सापडला. दोन मुलांची आई असलेली अमांडा सांगते, की तिने पाच वर्षांपूर्वी नोकरी गमावली होती आणि ती खूप निराश होती. एके दिवशी तिच्या पतीने तिला खूश करण्यासाठी बिस्किटाचं पॅकेट दिलं. जेव्हा अमांडाने हे पॅकेट उघडलं, तेव्हा तिचं आयुष्यच बदलून गेलं. पॅकेटमध्ये बिस्किटासोबत एक चिठ्ठी तिला सापडली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, की तू तुझ्या व्यवसायात कमालीची आनंदी राहणार आहेस. काही भाग्यवान आकड्यांसह ज्या व्यवसायांमध्ये ती यशस्वी होऊ शकते त्यांची नावंही त्या चिठ्ठीवर लिहिलेली होती. हे ही वाचा-बार्बी डॉलसारखं प्रायव्हेट पार्ट हवं म्हणून तिने स्वतःच्या व्हजायनाची लावली वाट ही चिठ्ठी वाचल्यानंतर अमांडाने ETSY दुकान (ETSY store) उघडलं. या व्यवसायात तिला अभूतपूर्व यश मिळालं. अमांडाचे कस्टम मेड बॅनर व्हायरल झाले आणि तिला त्याचा खूप फायदा झाला. अमांडा रातोरात कोट्यधीश झाली. आता तिची कंपनी 12 दशलक्ष डॉलरची झाली आहे. अमांडाने तिची ही गोष्ट टिकटॉकवर शेअर केली. लोकांनाही ती खूप आवडली आहे. आत्मविश्वासानं केलेलं प्रत्येक काम यश देतं, असा संदेश अमांडाने लोकांना दिला आहे.

  First published: