वॉशिंग्टन, 27 सप्टेंबर : अमेरिकेत एका 26 वर्षांच्या नौदल अधिकाऱ्याला ड्युटीवर (US Naval officer got permission to wear turban on duty) असताना पगडी घालण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. अमेरिकी नौदलाच्या 246 वर्षांच्या इतिहासात(Permission on certain conditions) पगडी घालण्याची परवानगी मिळाल्यामुळे नवा इतिहास नोंदवला गेला आहे.
पगडीसाठी संघर्ष
‘द न्यूयॉर्क टाईम्स’नं दिलेल्या बातमीनुसार लेफ्टनंट सुखबीर तूर हे गेल्या पाच वर्षांपासून ऑन ड्युटी पगडी घालण्याची परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. तूर यांना मिळालेली ही परवानगी म्हणजे गेल्या 246 वर्षांतील एक नवा विक्रमच आहे. आतापर्यंत शीख समाजातील अनेकांनी अमेरिकी सैन्यात नोकरी केली. मात्र कुणालाही अशी परवानगी देण्यात आली नव्हती. सुखबीर तूर हे अशी परवानगी मिळणारे पहिले शीख सैनिक ठरले आहेत.
व्यक्त केला आनंद
मला माझी श्रद्धा आणि माझा देश यातील एकच काही तरी निवडावं लागेल की काय, अशी भीती होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी यासाठी संघर्ष करत होतो. आता मला श्रद्धा आणि देश या दोन्हीसोबत एकत्र राहता येणार असल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मी जसा आहे, तसाच राहण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांनी अमेरिकेतील न्यायालयाने आभार मानले आहेत.
मिळाली सशर्त परवानगी
सुखबीर तूर यांना कर्तव्यावर असताना पगडी घालण्याची परवानगी मिळाली असली, तरी काही अटीदखील लादण्यात आल्या आहेत. सामान्य परिस्थितीत रोजच्या कामात ते पगडीचा वापर करू शकतील, मात्र युद्धजन्य परिस्थितीत त्यांना पगडी वापरता येणार नाही. त्याशिवाय जेव्हा जेव्हा नौदलाचे मोठे सार्वजनिक कार्यक्रम आणि कवायती असतात, तेव्हादेखील त्यांना पगडी न घालता इतरांसारख्या वेषातच यावं लागणार आहे.
हे वाचा - पेट्रोलची टाकी फुल करुन पसार होणारा अखेर गजाआड, पैसे न देताच काढायचा पळ
या नियमांविरोधातही लढा
सामान्य दिवशी पगडी वापरण्याची परवानगी मिळाली असली, तरी इतर अटीदेखील काढून टाकण्यात याव्यात, यासाठी तूर यांचा संघर्ष सुरू आहे. आपल्याला सदासर्वकाळ पगडी वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न करत राहण्याचा निर्धार त्यांनी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.