जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / असला कसला राग! कामावरून काढलं म्हणून कर्मचाऱ्यानं केला बॉसच्या 5 कोटींच्या गाडीचा चुराडा

असला कसला राग! कामावरून काढलं म्हणून कर्मचाऱ्यानं केला बॉसच्या 5 कोटींच्या गाडीचा चुराडा

असला कसला राग! कामावरून काढलं म्हणून कर्मचाऱ्यानं केला बॉसच्या 5 कोटींच्या गाडीचा चुराडा

बॉसनं नोकरीवरून काढून टाकलं म्हणून संतप्त ड्रायव्हरनं आपल्याच मालकाच्या Ferrari GTC4Lusso गाडीवर ट्रक चालविला.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिकागो, 11 मे : कधीकधी आपल्या कर्मचार्‍यांना दिलेल्या कठोर वागणूकीची मोठी किंमत मोजावी लागते. असाच एक भयंकर प्रकार घडला. बॉसनं नोकरीवरून काढून टाकलं म्हणून संतप्त ड्रायव्हरनं आपल्याच मालकाच्या Ferrari GTC4Lusso गाडीवर ट्रक चालविला. ही धक्कादायक घटना शिकागोमध्ये घडली. या घटनेच्या चार दिवसआधी या चालकाला त्याच्या वाईट वागणुकीमुळं कंपनीतून काढून टाकले होते. त्या चार दिवसांत, त्यानं फक्त एकदाच गाडी चालवली. कामात सातत्य नसल्यामुळं कंपनी त्याच्या वागण्यावर खूश नव्हती. त्यामुळं मालकानं त्याला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला पूर्ण नुकसान भरपाई देऊन सोडले. जेव्हा कंपनीने त्याला याबाबत माहिती दिली, तेव्हा त्यानं मालकाकडे कामावरून न काढण्यासाठी विनवण्या केल्या. वाचा- कॅन्सरग्रस्त लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी 50 दिवस दूर होता बाप, अखेर झाली भेट वाचा- VIDEO : लॉकडाऊनच्या नियमाला हरताळ, सायकलवरून विनामास्क फिरतायत भाजपचे खासदार कंपनी सोडण्यापूर्वी त्याने बॉसला एका गाडीकडे इशारा करून विचारले की, ही त्याची फरारी आहे का? बॉसने हो असे उत्तर दिले. त्यानंतर ड्रायव्हरने त्याला धमकी दिली की, य़ा निर्णयाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. थोड्या वेळानंतर हा ड्रायव्हर ट्रक घेऊन आला आणि उभ्या असलेल्या गाड्यांवर ट्रक चालवण्यास सुरुवात केली. त्याला रोखण्यासाठी बॉस त्याच्या मागे धावत निघाला पण ड्रायव्हरने दरवाजा बंद केला. त्यानंतर ड्रायव्हरनं मालकाच्या 5 कोटींच्या फेरारीवर ट्रक चढवला आणि गाडीचा चुराडा केला. या घटनेनंतर मालकाने पोलिसांना बोलावून चालकाला अटक केली. वाचा- रस्त्यावर चालता चालता गर्भवती महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO VIRAL वाचा- बघता-बघता नदीत तयार झाला खड्डा…समोर आलेलं सगळं केलं गिळंकृत, VIDEO VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात