वॉशिंग्टन, 09 जून : सारं जग सध्या कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी दोनहात करत आहे. यातच भूकंप, चक्रीवादळ, भुस्खलन यांसारख्या असंख्या संकटांशी 2020मध्ये सामना करावा लागत आहे. मात्र या सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे 2020मध्येच पृथ्वी तब्बल 8 संकटांतून थोडक्यात वाचलीही आहे. नासानं 5 जूनपासून अर्थ ऑब्जेक्ट्स (NEOs) पृथ्वीच्या जवळून जातील, अशी दिली होती. ही माहिती देताना सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट्स स्टडीजनं (CNEOS) म्हणाले की 5, 6,7 जून रोजी काही उल्का पृथ्वीच्या जवळून तर इतर लांबून जातील. मात्र नासानं या तिन्ही उल्का पृथ्वीच्या कक्षात आल्या नाहीत.
दरम्यान, याआधी 5 जून रोजी पृथ्वीच्या जवळून गेलेल्या उल्केचा वेग प्रति सेकंद 12.66 किलोमीटर होता. तर, 6 जून रोजी पृथ्वीच्या जवळून उल्का 2002 NN4 4 गेली. तिचा वेग 40,140 किमी / ताशी असेल. नासाच्या मते, या लघुग्रहांचा व्यास 570 मीटर होत. म्हणजेच ही उल्का तब्बल 5 फुटबॉल क्षेत्राइतकी होती. सेंटर फॉर नेर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजनुसार 21 मे रोजी 1.5 कि.मी. मोठी उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली होती. अशा 2000 उल्का असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांचा नासा संस्थांकडून मागोवा घेतला जात आहे.
वाचा-पावसात कितीही मोठे संकट आले तरी, 'हे' मालवणी वॉरियर्स आहे सज्ज
5 आणि 6 जून नंतर 7 जून रोजी दुपारी 12.03 उल्का 2020 K-7 पृथ्वीच्या जवळून गेली. हिचा वेग ताशी 26,424 किलोमीटर होता. 5 ते 7 जून दरम्यान गेलेली उल्का पृथ्वीच्या कक्षात आली नाही. त्यामुळं पृथ्वी मोठ्या संकटातून वाचली असं म्हणायला हरकत नाही.
वाचा-काही दिवसांत बदललं पुण्याचं चित्र, कोरोनाबाबत ही आहे POSITIVE NEWS
वाचा-लशीशिवाय 'या' देशानं कोरोनाला हरवलं! तीन महिन्यात असा झाला कोरोनामुक्त
संकलन, संपादन-प्रियांका गावडे.