मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पावसाळ्यात कितीही मोठे संकट आले तरी, 'हे' मालवणी वॉरियर्स आहे सज्ज

पावसाळ्यात कितीही मोठे संकट आले तरी, 'हे' मालवणी वॉरियर्स आहे सज्ज

कोरोनाचं संकट असलं तरीही वेळ पडल्यास आम्ही PPE  किट घालून काम करू, असा इरादा या बचाव पथकाने केला आहे.

कोरोनाचं संकट असलं तरीही वेळ पडल्यास आम्ही PPE किट घालून काम करू, असा इरादा या बचाव पथकाने केला आहे.

कोरोनाचं संकट असलं तरीही वेळ पडल्यास आम्ही PPE किट घालून काम करू, असा इरादा या बचाव पथकाने केला आहे.

 सिंधुदुर्ग, 08 जून : 'तुम्ही हाक मारा,आम्ही हजर असू' हे ब्रिद घेउन मालवणच्या मच्छीमारांचं बचाव पथक याही वर्षी सर्व साधनसामुग्रीसह सज्ज झाले आहे. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तींमध्ये मग तो पूर असो किंवा वादळ, आम्ही कुठेही केव्हाही मदतीसाठी धावून येऊ अशी ग्वाही या मच्छिमारांनी दिली.

यासाठी मच्छिमारांनी होडी, इंजिन, ऑक्सिजन सिलिंडर आणि स्कुबा डायव्हिंगचे साहित्य आणि अन्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पंधरा ते वीस जणांच्या या पथकाने महाड च्या सावित्री पूल दुर्घटनेवेळी वाहून गेलेले मृतदेह शोधून काढण्यात महत्वाची कामगिरी बजावली होती. इतकंच नाही तर गेल्यावर्षी आलेल्या कोल्हापूर-सांगली मधल्या पुरात अडकलेल्याना मदत करण्यासाठी देखील या मच्छिमारांनी आपल्या होड्या त्या पुरात लोटल्या आणि अनेकाना बाहेर काढलं. त्यामुळे या वर्षी जरी  कोरोनाचं  संकट असलं तरीही वेळ पडल्यास आम्ही PPE  किट घालून काम करू असा इरादा करत या बचाव पथकाने आपले हेल्पलाईब नंबर्स जाहीर केले आहेत.

आपत्कालीन बचावासाठी 

9422552128 राजू परब 

7820822388 अन्वय प्रभू

9764593259 भाई जाधव 

या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन या बचाव पथकाने केले आहे.

कशी आहे तयारी बचाव पथकाची ?

मालवण दांडी भागातल्या अनुभवी पारंपरिक मच्छिमारांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या या बचाव पथकात निष्णात स्कूबा डायवर्स आणि जलतरणपटूंचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी सुरू झालेली मासेमारी व्यवसायातल्या मंदीतून बाहेर येण्यासाठी या मच्छीमार तरुणांनी सागरी पर्यटन व्यवसायात उडी घेत मालवण किनाऱ्यावर साहसी जलक्रीडा प्रकार सुरू केले. त्यासाठी त्यानी सर्व प्रकारची सामुग्री आणली आहे. त्यात लाईफ जॅकेट्ससह ऑक्सिजन सिलिंडर, स्कुबा किट्स , रोप्स, फ्लोट ट्युब्स यासह बचावासाठी लागणारं साहित्य आहे.

हेही वाचा -धक्कादायक! औरंगाबादेत कोविड सेंटरमधून 2 कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

कुठे काही आपत्ती असल्याचं कळताच हे बचाव पथक स्वत:च्या वाहनासह घटनास्थळी हजर होऊन प्रशासनाला आणि लोकांना  कुठे गरज असेल तिथे जाऊन आपदग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करते. वादळवाऱ्यातही समुद्रातल्या मासेमारीचा गाढा अनुभव ,  प्रचंड पुरातून होडी बाहेर काढण्याचं कसब आणि प्रतिकूल परिस्थितीशी प्रसंगी जीव धोक्यात घालून टक्कर घेण्याचं धारिष्ट्यं या बचाव पथकातल्या मच्छीमारांत आहे.  म्हणूनच सामाजिक जबाबदारीतून मालवणच्या मच्छीमारांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचं सगळीकडून कौतुक होतं आहे.

First published:
top videos

    Tags: Sindhudurg