मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'तिला झपाटलं होतं...', गर्लफ्रेंडचा खून केल्यानंतर दिलं धक्कादायक कारण, बाथटबमध्ये बुडवून केली हत्या

'तिला झपाटलं होतं...', गर्लफ्रेंडचा खून केल्यानंतर दिलं धक्कादायक कारण, बाथटबमध्ये बुडवून केली हत्या

दुबईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणीचा मृतदेह बाथटबमध्ये (Dubai boyfriend murdered girlfriend) आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या बॉयफ्रेंडने केला होता.

दुबईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणीचा मृतदेह बाथटबमध्ये (Dubai boyfriend murdered girlfriend) आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या बॉयफ्रेंडने केला होता.

दुबईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणीचा मृतदेह बाथटबमध्ये (Dubai boyfriend murdered girlfriend) आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या बॉयफ्रेंडने केला होता.

  दुबई, 06 ऑगस्ट: दुबईमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणीचा मृतदेह बाथटबमध्ये (Dubai boyfriend murdered girlfriend) आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या बॉयफ्रेंडने केला होता. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या बॉयफ्रेंडनेच त्याच्या गर्लफ्रेंडचा खून (Dubai Man killed girlfriend) केल्याचे स्पष्ट झाले. पण तरीही तिने आत्महत्या केल्याचेच या तरुणाचे म्हणणे होते. यामागचे कारण जेव्हा त्याने सांगितले, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले.

  गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यामध्ये वाद होणं सामान्य बाब आहे. असे वाद किरकोळ असतील, तर दोन्ही बाजूंनी समजून घेता येऊ शकतं. पण हे वारंवार आणि अधिक तीव्र होत असतील, तर मात्र ब्रेकअप करुन वेगळं होणं हाच उत्तम पर्याय असतो. कारण असे वाद कोणत्या थराला जाऊ शकतात याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. दुबईमधील एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला चक्क बाथटबमध्ये बुडवून (Dubai Man drowns girlfriend in Bathtub) मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, गर्लफ्रेंडच्या अंगात भूत शिरल्यामुळे तिने आत्महत्या (Dubai man blames Jinn for girlfriends suicide) केल्याचा या तरुणाचा दावा होता. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  हे वाचा-भारतीय विद्यार्थ्याची चीनमध्ये निर्घृण हत्या, सडलेल्या मृतदेहाचा वास सुटल्याने झ

  मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने आधी आपल्या मित्रांना सांगितले होते, की त्याच्या गर्लफ्रेंडची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ढासळली आहे. तिला बरं करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही तो मित्रांना म्हणाला होता. गर्लफ्रेंडची हत्या करण्यापूर्वी त्याने एका मित्राला फोन करत, “माझ्या गर्लफ्रेंडच्या शरीरात जिन (Dubai Jinn possessed girlfriend) (अरबी दंतकथांमधील भूत) शिरला आहे. त्यामुळे मला मदतीची गरज आहे.” असं म्हटलं होतं. हत्या करुन झाल्यानंतरही तो सगळ्यांना हेच सांगत होता.

  हे वाचा-पुणे: मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; अल्पवयीन मुलावर चाकूनं वार

  पोलिसांच्या तपासात असं समोर आलं, की ज्या दिवशी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली, त्या दिवशी तो नशेत होता. या गर्लफ्रेंडसोबत तो बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, त्याची इतरही अफेअर्स होती. या अफेअर्समुळे त्याला आता गर्लफ्रेंडचा वैताग आला होता. हत्येच्या दिवशी त्याने आपल्या गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला बाथटबमध्ये बुडवून कितीतरी तास तिचा मृतदेह तिथेच ठेवला. यानंतर त्याने तो मृतदेह बाहेर काढत अम्ब्युलन्स बोलावली. पोलीस या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडने आत्महत्या (Man claims girlfriend possessed by Jinn) केल्याचे सांगितले. पुढे त्यानेच हत्या केल्याचे समोर आल्यानंतरही गर्लफ्रेंडच्या अंगात जिन शिरल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे तो म्हणत होता.

  पोलिसांनी त्याच्या मित्रांचा आणि शेजाऱ्यांचा जबाब नोंदवला. मिळालेल्या पुराव्यांमधून त्यानेच ही हत्या केल्याचे सिद्ध झाले. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

  First published:
  top videos

   Tags: Crime, Crime news, Murder