जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; पुण्यात अल्पवयीन मित्रावर चाकूनं वार

मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; पुण्यात अल्पवयीन मित्रावर चाकूनं वार

मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्यानं तरुणाची सटकली; पुण्यात अल्पवयीन मित्रावर चाकूनं वार

Crime in Pune: पुण्यात मेडिकलमधून कंडोम आणण्यास नकार (did not bring a condom from medical) दिल्यानं एका तरुणानं आपल्या अल्पवयीन मित्रावर चाकूने वार (Knife attack) केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 08 ऑगस्ट: पुण्यातील खराडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेडिकलमधून कंडोम आणण्यास नकार दिल्यानं एका तरुणानं आपल्या अल्पवयीन मित्रावर चाकूने वार केले आहेत. आरोपीनं जवळच उभ्या असणाऱ्या वडापावच्या गाड्यावरील चाकू घेऊन फिर्यादीच्या गळ्यावर वार केला आहे. याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. केवळ मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिल्याने झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निलेश वाघमारे असं 21 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. मेडिकलमधून कंडोम न आणल्याच्या कारणातून त्याने आपल्या अल्पवयीन मित्रावर चाकू हल्ला केला आहे. तुकारामनगर येथील रहिवासी असणारा फिर्यादी तरुण आपल्या मित्राला भेटण्यासाठी थिटेवाडी परिसरात गेला होता. दरम्यान आरोपी निलेश यानं अल्पवयीन मुलाला पैसे देऊन मेडिकलमधून कंडोम आणण्यास सांगितलं. मात्र फिर्यादी मुलानं याला स्पष्टपणे नकार दिला. हेही वाचा- VIDEO: नवी मुंबईत लुटमार, बंदुकीचा धाक दाखवत सोन्याने भरलेली बॅग केली लंपास मेडिकलमधून कंडोम आणून न दिल्याच्या रागातून आरोपीनं अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं ‘माझं काम तू ऐकत नाही का, थांब आता तुला जिवंत सोडत नाही’ अशी धमकी दिली. तसेच जवळच उभ्या असणाऱ्या एका वडापावच्या गाड्यावरून चाकू घेऊन अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर वार करून जखमी केलं आहे. हेही वाचा- पुण्यात विद्रुप करण्यासाठी पतीनं कापले पत्नीचे सुंदर केस ही घटना घडल्यानंतर जखमी तरुणानं चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या मित्राविरोधात फिर्याद दाखल केली आहे. चंदननगर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासोबतच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदनगर पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात