पटना, 5 ऑगस्ट : चीनमध्ये (China) बिझनेस स्टडीचा (Business Study) अभ्यासक्रम शिकण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या (Murder in China) कऱण्यात आल्याचं उघड झालंय. या तरुणाच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूचे वार (Wounds of attack) केल्याच्या खुणा आढळल्या असून चीनमध्येच करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून (Postmortem) ही बाब उघड झाली आहे. मात्र चीनकडून आता याबाबतचे रिपोर्ट देण्यात टाळाटाळ होत असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
नेमकं काय घडलं?
बिहारच्या गयामध्ये राहणारा विद्यार्थी नागसेन अमन चीनमधील विद्यापीठात बिझनेसचे शिक्षण घेत होता. त्चाच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याचा मृतदेह विद्यापीठातील डॉरमेटरी रुममध्ये कित्येक दिवस पडून होती. कुणालाही त्याचा पत्ता लागला नाही. काही दिवसांनी जेव्हा हा मृतदेह सडू लागला, तेव्हा त्याचा वास विद्यापीठात पसरायला सुरुवात झाली. त्यामुळेच या हत्येचा उलगडा झाला.
चीनमध्येच पोस्टमार्टम
चीनमध्येच अमनच्या मृतदेहाचं विच्छेदन कऱण्याचा निर्णय घेण्यात आला. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी सिद्धार्थ जुमरानी याच्या उपस्थितीत पोस्टमार्टेम करायला अमनच्या कुटुंबीयांनी मान्यता दिली होती. सिद्धार्थने दिलेल्या माहितीनुसार अमनच्या शरीरावर ठिकठिकाणी चाकूने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.
हे वाचा -इतर ठिकाणची गर्दी चालते, तर लोकलमधील का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
चीनकडून प्रतिसाद नाही
चीनकडून पोस्टमार्टम होईपर्यंत तत्परता दाखवण्यात आली, मात्र त्यानंतर कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यापासून अमनचे पार्थिव पाठवण्यापर्यंत कुठल्याच बाबतीत चीनकडून प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर भारत सरकारनं मध्यस्थी केल्यानंतर चीन सरकारकडून हालचाली करण्यात आल्या आहेत. नागसेन अमन याचा मृतदेह आता 11 ऑगस्टला भारतात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याची कल्पना अमनच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून भारताच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी या प्रकरणी पाठपुरावा करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china, Murder