नवी दिल्ली, 06 मे : कोरोनामुळं सध्या सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं जवळजवळ सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत एका ड्रायव्हरचं नशीब फळपळलं. अब्दुल सलाम शानवास या केरळच्या वाहनचालकाने अबुधाबीत 2 लाख 72 हजार 260 अमेरिकन डॉलर्सची म्हणजे तब्बल 2 कोटींची लॉटरी जिंकली. गेली 50 वर्ष वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या अब्दुल यांनी स्वप्नातही विचार नव्हता केला.
खलीज टाइम्स या वृत्तसंस्थेनं अब्दुल यांना लॉटरी लागल्याचे वृत्त दिले. अब्दुल यांनी खलीज टाइम्सशी बोलताना सांगितले की, मी 50 वर्ष काम करत आहे. या रकमेच्या आसपास जाणारी कमाईही मी कधी करू शकलो नाही. अब्दुल केरळमधून 1997मध्ये अबुधाबीत आले होते. शारजाहमध्ये त्यांनी वाहनचालकाचे काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांना जास्त कमाई करता आली नाही. त्यानंतर शारजाहमधून त्यांनी अबुधाबीला जाण्याचा निर्णय घेतला. अबुधाबीमध्ये सध्या ते 650 डॉलर (49 हजार) कमवतात.
वाचा-'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO
मात्र, अब्दुल यांचं नशीब एक लॉटरीनं बदललं. त्यांनी ही लॉटरी मिल्यनेअर कॅम्पेनमध्ये जिंकली. अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून उन्हाळ्यात समल सेल्स हा कार्यकार्यक्रम असतो. शानवास यांनी 54 डॉलर्सना ही लॉटरी विकत घेतली होती. त्यांनी सांगितले की, "5 ऑगस्ट 2019मध्ये मला लॉटरी लागल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत ही माहिती कोणासही सांगण्यास मनाई करण्यात आली होती. मी केरळमध्ये राहणाऱ्या माझ्या कुटुंबालाही याबाबत काही सांगितले नव्हते". आश्चर्याची बाब म्हणजे अब्दुल यांनी लॉटरीसाठी नोंदणी केल्यानंतर आलेला मेसेज डिलीट केला होता. मात्र तेच विजेते असल्याची खात्री त्यांच्या फोन क्रमांकावरून झाली.
वाचा-अखेर पठ्ठ्याला मिळाला दारूचा खंबा, मग रस्त्यावरच असं काही केलं की... पाहा VIDEO
दरम्यान 2 कोटी रुपयांचे बक्षिस मिळाल्यानंतर अब्दुल यांनी घर बांधायचे असल्याचे सांगितले. 2021मध्ये घराचे बांधकाम सुरू करणार असून, त्यासाठी त्यांनी एक प्लॉटही विकत घेतला आहे.
वाचा-बोहल्यावरून थेट आजीची भेट घ्यायला रुग्णालयात पोहोचली लाडकी नात, पाहा VIDEO