• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बोहल्यावरून थेट आजीची भेट घ्यायला रुग्णालयात पोहोचली लाडकी नात, पाहा VIDEO

बोहल्यावरून थेट आजीची भेट घ्यायला रुग्णालयात पोहोचली लाडकी नात, पाहा VIDEO

आपल्या लाडक्या नातीला वधुच्या कपड्यांत पाहून आजीला झालेला या आनंदाचं शब्दांत वर्णन करता येणार नाही.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 05 मे : जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. या काळात घरातून बाहेर पडण्यास बंदी असतानाही अनेक लग्नं झाली आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक नवरी तिच्या नवऱ्यासोबत आजीला भेटायला गेल्याचं दिसत आहे. लॉकडाऊनमुळे आजीला लग्नाला उपस्थित राहता आलं नव्हतं. यामुळे वधु वरांनी बोहल्यावरून थेट हॉस्पिटल गाठलं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नवरी तिच्या आजीची भेट घेते. एका खिडकी बाहेर उभा राहूनच ती आजीची भेट घेते. कंट्री मेनर कॅम्पसने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये आजी तिची नात येणार म्हणून वाट बघत बसलेली दिसते. एका खिडकीजवळ बसलेल्या आजी जेव्हा नातीला वधुच्या पोषाखातच पाहते तेव्हा तिला झालेला आनंदही दिसतो. अमेरिकेतील मिनेसोटा इथं राहणाऱा शाउना वॉर्नरचं 25 एप्रिलला लग्न झालं. यावेळी तिची आजी लॉकडाऊनमुळे येऊ शकली नव्हती. तेव्हा लग्नानंतर शाउना तिच्या पतीसह आजीच्या भेटीला गेली होती. हे वाचा : तरुणाला सुरू झाला श्वसनाचा त्रास, X-Ray मधून समोर आली धक्कादायक माहिती शाउनाची आजी जेनिस ही कंट्री मेनर कॅम्पसमध्ये रॅपिड रिकव्हरीमध्ये उपचार घेत आहे. आजी जेव्हा तिच्या या लाडक्या नातीची वाट बघत होती तेव्हा म्हणते की,'माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिची अजुन वाट नाही बघू शकत.' शाउनाला कारमधून उतरताना पाहून आजी खूप खूश होते. हे वाचा : आईच ती! आजारी पिल्लाला तोंडात धरून मांजरीन पोहोचली रुग्णालयात, पाहा PHOTO
  Published by:Suraj Yadav
  First published: