मुंबई, 5 मे : लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारनं वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात सर्वच ठिकाणी दुकानांसमोर मद्यपींची एकच गर्दी उसळलेली दिसून आली. अनेक ठिकाणी ही गर्दी पांगवण्यासाठी पोलीसांना आक्रमक भूमिका सुद्धा घ्यावी लागली. मात्र जेव्हा तासंतास रांगेत उभं राहून जेव्हा एका मद्यपीला दारू मिळाली तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा होता. दारूची बाटली मिळताच या माणसानं दुकानासमोरचं डान्स करायला सुरुवात केली. सलमान खानच्या गाण्यावर डान्स करतानाचा या माणसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तेलंगणा, आंध्रप्रदेश भागातला असल्याचं बोललं जात आहे. या व्यक्तीनं दारु मिळताच सलमान खानच्या रेडी सिनेमातील ढिंका-चिका या गाण्यावर डान्स करायला सुरुवात केली. हा सिनेमा मूळ साऊथ डबिंग असल्यानं ही व्यक्ती साउथ सिनेमातील गाणं गात डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान केरळ आणि मध्य प्रदेशातील दारूची दुकान अद्याप बंद ठेवण्यात आलेली आहेत. तर गोव्यातील दुकान सोमवार पासून सुरू करण्यात आली आहेत मात्र त्या ठिकाणी कोणत्याही दुकानासमोर फार गर्दी नव्हती. या ठिकाणी मास्क नाही तर दारू नाही अशी युक्ती वापरण्यात आली. तर कर्नाटकातील काही भागातील दारूची दुकान सुरू झाल्यावर लोकांना याबाबत आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर लोकांची प्रचंड गर्दी झालेली दिसली. तसेच बंगळुरू आणि अन्य भागातही दारूची दुकानं सुरू झाल्यावर लोक मोठ्या संख्येन दारू घेण्यासाठी आलेले पाहायला मिळले.
दरम्यान तमिळनाडू सरकारनं 7 मे पासून दारूची दुकानं सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र रेड झोनमधील दारूची दुकानं सुरू करण्याच्या शक्यतेला सरकारनं नकार दिला आहे. अशात ज्या भागात दारूची दुकानं सुरू करण्यात आली आहेत अशा काही ठिकाणी सरकार कडून जारी करण्यात आलेल्या सोशल डिस्टसिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं पाहायला मिळालं.
(संपादन- मेघा जेठे.)
पुण्यात दारू घेण्यासाठी गाडीवर नाही पायी जावं लागणार, हे 6 नियम पाळावेच लागणार
दारू विक्री सुरू झाली पण बारामतीतून आली धक्कादायक बातमी, सरपंचाच्या पती मृत्यू मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.