नवी दिल्ली, 5 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. परिणामी इतर उद्योगांवर याचा परिणाम झाला आहे. आवश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय आणि उद्योग धंदे ठप्प आहेत. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. या सगळ्या महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्र यांनी व्हिडीओ शेअर करत आपली अर्थव्यवस्था पुढे कशी जाईल, याचा संदेश दिला.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे शक्य आहे का? असा सवाल तुमच्या मनात येईल पण हे खरे आहे. देसी जुगाड वापरून दोन चाकांवर ही व्यक्ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी अर्थव्यवस्थेत कसे संतुलन राखले पाहिजे याचे उदाहरण दिले आहे.
वाचा-चक्क माकडाच्या पिल्लानं चिमुकल्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO
या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनी, "ही व्यक्ती निमयांचे उल्लंघन करीत आहे. मात्र हे चित्र पाहून माझ्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. कारण दोन चाकं नसली तरी, तो ट्रॅक्टर चालवत आहे, आपणही अशीच आपली अर्थव्यवस्था पुढे घेऊन जाऊ शकतो", असे ट्वीट केलं आहे.
वाचा-VIDEO:आम्हाला तुमचा अभिमान आहे!'कोरोना योद्धा' डॉक्टरचं घरी असं झालं स्वागत
He was clearly violating the rules of the road, but on a monday morning I find this image uplifting. Because even without two wheels, perhaps we’ll find a way to get our economy moving with a perfect balancing act! https://t.co/wKUyd3zJo7
— anand mahindra (@anandmahindra) May 4, 2020
वाचा-VIDEO : लहान भावानं केली गंमत, छतावरून जमीनीवर पडली तरुणी
भारतात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढला
एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखणे गरजेचे असले तरी दुसरीकडे लॉटकडाऊनचा कालावधी वाढवला जात आहे. 4 मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान या लॉकडाऊनमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सूट देण्यात आल्या आहे. आरोग्य मंत्रालयानं देशातील संपूर्ण जिल्हे हे ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशी तीन झोनमध्ये विभागले आहे. या झोननुसार सवलती देण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.