VIDEO : मास्कच्या कारखान्यातच मास्क न घालता फिरले डोनाल्ड ट्रम्प मग...

VIDEO : मास्कच्या कारखान्यातच मास्क न घालता फिरले डोनाल्ड ट्रम्प मग...

तब्बल 2 महिन्यांनंतर ट्रम्प व्हाइट हाउसच्या बाहेर पडले. मात्र मास्क न घालता फिरत असल्यामुळं त्यांच्यावर टीका केली जात आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 06 मे : जगभरात कोरोनामुळं हाहाकार माजला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळं सर्वात जास्त बळी गेले आहेत. असे असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) मात्र लॉकडाऊन हटवण्याबाबत बोलत आहेत. त्याच्या या भुमिकेवर टीका केली जात असताना आता ट्रम्प यांचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी N-95 मास्क तयार करणाऱ्या कारखान्याला भेट दिली. आश्चर्याची बाब म्हणजे कारखान्याला भेट देत असताना त्यांनी स्वत:हून मास्क घालण्यास नकार दिला. तब्बल 2 महिन्यांनंतर ट्रम्प व्हाइट हाउसच्या बाहेर पडले. मात्र मास्क न घालता फिरत असल्यामुळं त्यांच्यावर टीका केली जात आहे.

लॉस एंजेलिस टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार , ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान कारखान्यात 'मास्क घालणे बंधनकारक असल्याचा बोर्डही लावण्यात आला होता. यावेळी ट्रम्प यांनी मस्करी करत, आता अखेर मी मास्कचा वापर करू शकते, असे म्हणत सध्याच्या परिस्थितीची थट्टा केली. कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना संबोधित करताना ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा वाईट काळ निघून गेला आहे आणि आता घाबरून जाण्याची गरज नाही, असे सांगितले.

वाचा-मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवली

मागे वाजत होते live and let die हे गाणं

ट्रम्प यांनी या कारखान्याला भेट दिली तेव्हा प्रसिद्ध बॅन्ड गन्स अँड रोज्स यांचे 'लिव्ह अँण्ड लेट डाय' गाणे वाजत होते.या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. दुसरीकडे, ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत आहे आणि हे युद्ध आता पुढच्या टप्प्यात पोहचले आहे जे अत्यंत सुरक्षित, टप्प्याटप्प्याने देशातील लॉकडाऊन हटवणार आहे.

वाचा-दारूबंदी उठवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने व्यक्त केली भीती

फिनिक्समधील हनीवेल इंटरनॅशनल येथे भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, 'नागरिकांच्या बांधिलकीबाबात धन्यवाद. आपण कोरोनावर नक्कीत मात करू. आपला देश लढ्याच्या पुढील टप्प्यात आहे. हा देश अतिशय सुरक्षित, टप्प्याटप्प्याने आणि हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. मात्र ट्रम्प यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांची मस्करी करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा-काय म्हणताय! आता 'हा' प्राणी माणसांंना Coronavirus पासून वाचवणार?

First published: May 6, 2020, 2:12 PM IST

ताज्या बातम्या