अहमदनगर, 6 मे: लॉकडाऊनच्या काळात दारूबंदी उठवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
दारुबंदी उठवून सरकार काय साध्य करणार आहे. केवळ महसूल मिळविण्यासाठी दारू विकून सर्वसामान्यांशी जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. श्रीमंत लोक पिवून घरात बसतील, परंतु सर्वसामान्य लोक पिवून लॉकडाऊनच्या काळात तमाशा उभा करतील. घरात बसून राहणे सक्तीचे असल्याने पत्नीला मारहाण करतील. यातून सोशल डिस्टन्सचे काय होणार? असा सवाल उपस्थित करुन मद्यपी लोक 'कोरोना कॅरिअर' होऊ शकतात, अशी भीती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा..भूमीपुत्रांनो घ्या संधीचा फायदा, नोकरभरती रद्दच्या निर्णयावर रोहित पवारांच ट्वीट
महाआघाडीच्या सरकारने केवळ अर्थार्जनाचा विचार न करता त्यातून होणाऱ्या भयानक अनार्थाचाही विचार करून दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विनायक देशमुख यांनी एका मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनाही याबाबत कळवले, असल्याचं विनायक देशमुख यांनी सांगितलं आहे. श्रीमंत लोक पिवून घरात बसतील, परंतु सर्वसामान्य लोक पिवून लॉक डाऊनच्या काळात तमाशा उभा करतील. घरात बसून राहणे सक्तीचे असल्याने पत्नीला मारहाण करतील. हे मद्यपी लोक कोरोना कॅरिअर होऊ शकतात. या मुळे दारूबंदी उठवण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा.. नुसता राडा! 52 हजाराच्या दारूचं बिल सोशल मीडियावर व्हायरल, सत्य वाचून धक्का बसेल
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गमुळे गेल्या 50 दिवसांपासून मुंबईसह राज्यात वाईन शॉप, बार, बिअर शॉपी पूर्णपणे बंद होते. देशाचा व राज्याचा करोडो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे कारण देत अनेकांनी वाईन शॉप सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली जात होती. अखेर सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह वाईन शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आले. काही अटी सापेक्ष राज्यात वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सोमवारपासून वाईन शॉप सुरू झाले. पण तळीराम यांनी प्रचंड मोठ्या रांगा लावत नियमांचे उल्लंघन केलं. यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जाही उडाला आहे.