टेक्सास, 06 मे : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) लस आणि औषध शोधत आहेत. त्यात आता एक दिलासा देणारी बातमी म्हणजे लामा (Llama) या प्राण्याच्या शरीरात कोरोनाव्हायरशी लढणाऱ्या अँटिबॉडीज सापडल्यात. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या (University of Texas) शास्त्रज्ञांनी केलेला हा अभ्यास जर्नल सेलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोरोनाव्हायरसचे स्पाइक मानवी पेशींमध्ये असलेल्या प्रोटिनशी जोडले जातात आणि हा व्हायरस मानवासाठी घातक ठरतो आणि हीच प्रक्रिया कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शास्त्रज्ञांना दिसून आलं की लामा प्राण्यातील अँटिबॉडीज व्हायरशी जोडून व्हायरसला मानवी पेशींना जोडण्यापासून रोखत आहेत.
विंटर नावाच्या बेल्जियम लामावर अभ्यास
या प्राण्याला कित्येक आठवडे सार्स आणि मर्स आजाराचे प्रोटिन इंजेक्शनमार्फत टाकण्यात आले आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आलं. काही कालावधीतच त्याच्या शरीरातील अँटिबॉडीज या व्हायरसचा सामना करू लागले. शास्त्रज्ञ 2 प्रकारच्या अँटिबॉडीजना त्याच्या शरीरातून आयसोलेट करण्यात यशस्वी झालेत, जे कोरोनाव्हायरसचा प्रभाव रोखतील.
हे वाचा - फळं आणि भाजी खरेदीला जाताय, काळजी घ्या...नाहीतर घरी कोरोनालाही आणाल
या संशोधनाचे अभ्यासक जॅसन मॅकलेनन यांच्या मते, या अशा अँटिबॉडीज आहेत, ज्या SARS-CoV-2 च्या परिणामाला न्यूट्रलाइज करत असल्याचं दिसून आलं आहे.
अभ्यासक डॅनिअल रॅप यांनी सांगितलं अभ्यासाचा सुरुवातीचा आलेला परिणाम खूपच सकारात्मक आहे. विंटर सध्या ठिक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोण आहे हा लामा प्राणी?
हा उंट आणि मेंढीच्या मधली प्रजाती आहे, जी दक्षिण अमेरिकेत सापडते. सामान्यपणे लोकर मिळवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जंगली प्राणी असूनही त्यांना ट्रेनिंग देणं सोप असतं. एकदा-दोनदा शिकवलं तरी ते कोणतंही काम शिकतात. यांच्या शरीरात एक वेगळ्या प्रकारचे अँटिबॉडी तयार होतात. त्यांचा आकारही मानवी शरीरातील अँटिबॉडीजपेक्षा वेगळा असतो.
हे वाचा - किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत संशय कायम? 'तो' VIDEO खोटा असल्याची माहिती लीक
आता टेक्सास युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या अँटिबॉडीवर प्री-क्लिनिकल स्टडी सुरू केला आहे. त्यांच्या मते, लस तयार जरी झाली तरी शरीरात त्याचा परिणाम व्हायरला 1 किंवा 2 महिने लागतात. मात्र जर अँटिबॉडी थेरेपी काम करू लागली तर लोकांच्या शरीरात थेट अँटिबॉडी टाकल्या जातील. जेणेकरून त्यांना कोरोनाव्हायरसपासून लगेच सुरक्षा मिळेल.
शास्त्रज्ञांच्या मते, जर हा अभ्यास पूर्णपणे यशस्वी झाला तर या अँटिबॉडी नेब्युलायझरप्रमाणे वापरल्या जातील जेणेकरून श्वासामार्फत शरीरात पोहोचतील.
संकलन, संपादन - प्रिया लाड