वॉशिंग्टन, 21 एप्रिल : कोरोनामुळे अमेरिकेत परिस्थिती बिकट आहे. येथे दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच कोरोनावर मात करण्यासाठी अमेरिका सध्या दिवस-रात्र एक करून लस तयार करत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की देशभरात कोरोना विषाणूच्या लसीची 72 सक्रिय चाचण्या सुरू असून लवकरच चांगली बातमी मिळेल. दरम्यान, तेल अवीव (Tel Aviv) विद्यापीठात काम करणाऱ्या एका इस्त्रायली शास्त्रज्ञाने कोरोना कुटुंबातील विषाणूंसाठी लस डिझाइनचे पेटंट मिळविले आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांच्या मते, उपचारांना अशा प्रकारे विकसित केले जात आहे, ज्यामुळे कोरोनाचे संक्रमण कमी होईल. सध्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊस येथे पत्रकारांना सांगितले की, "संपूर्ण अमेरिकेत आता 72 सक्रिय चाचण्या सुरू आहेत, ज्यावर डझनभर वैद्यकीय पद्धती आणि उपचारांचा शोध घेण्यात आला आहे आणि आणखी 211 योजना आखण्यात आल्या आहेत. ते खरोखरच त्याच्या उपचार आणि लस तयार करण्यात व्यस्त आहेत आणि लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड प्रगती झाली आहे". अमेरिकेत 7 लाख 99 हजार 515 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 42 हजार 897 लोकांचा मृत्यू झाला आहे.
वाचा-परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
अमेरिका लवकरच कोरोनाला हरवेल : ट्रम्प
अध्यक्ष ट्रम्प यावेळी म्हणाले की, "असा प्रकार कधीच कोणी पाहिला नाही. याकाळात बर्याच चांगल्या गोष्टीही घडत आहेत, परंतु शेवटी सुरक्षित लसद्वारे संक्रमण थांबवण्याची आशा करतो आणि जेव्हा ते घडेल तेव्हा ही मोठी गोष्ट असेल". ज्या दिवशी कोरोनाने अमेरिकेत शिरकाव केला. त्या दिवसापासून अमेरिकेने लसीवर काम सुरू केले.
वाचा-उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी, जीवाला धोका
'अशी अमेरिका तयार करा म्हणजे कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही'
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या रोगातून एक धडा घेतला आहे. तो म्हणजे अमेरिकेने देशात साखळी पुरवठा (सप्लाय चेन) तयार केल्या पाहिजेत". ते म्हणाले की, आता आपण असा देश तयार करायचा जो दुसर्या कोणावरही अवलंबून नसेल. दरम्यान, याआधी अमेरिकेला काही वैद्यकीय संबंधित वस्तूंसाठी आणि मलेरिया औषधाच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसह इतर औषधांसाठी भारतसह अनेक देशांवर अवलंबून आहे. अमेरिका आपली बहुतेक औषधी उत्पादने भारत आणि चीनमधून निर्यात करते.
वाचा-किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत दक्षिण कोरियामधून आली सर्वात मोठी बातमी
परदेशी नागरिकांना प्रवेश बंदी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची वाढती आपत्ती लक्षात घेता सोमवारी एक मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि एका अदृश्य शत्रूशी (कोरोनाव्हायरस) सामोरे जाण्यासाठी असा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी ट्वीट करत, मी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यानुसार इतर कोणत्याही देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.
संकलन, संपादन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona