Home /News /videsh /

'कोरोनामुळे 1 लाख लोकं मेली तरी ही आपली चांगली कामगिरी', ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

'कोरोनामुळे 1 लाख लोकं मेली तरी ही आपली चांगली कामगिरी', ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 402 झाली आहे. तर, 2 हजार 497 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

    न्यूयॉर्क, 30 मार्च : कोरोनाव्हाययरसने जगभरात हाहाकार माजला असताना, अमेरिकेत परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. चीनमधून आलेल्या या व्हायरसने या महासत्ता देशाचे कंबरडे मोडले. अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 402 झाली आहे. तर, 2 हजार 497 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या अमेरिकेत कमी असली तरी, रुग्णांचा आकडा मात्र वाढता आहे. अशा परिस्थितीतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र व्हाईट हाऊसमध्ये लॉक डाऊनची घोषणा करताना ट्रम्प यांनी एक अजब वक्तव्य केले, या वक्तव्यावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या जनतेशी संवाद साधताना, जर आमच्या प्रशासनाने मृत्यांची संख्या 1 लाखांपर्यंत आटोक्यात आणली तर ते खूप चांगले काम असेल, असे वक्तव्य केले. ट्रम्प यांच्या अशा वक्तव्याने सर्व चकित झाले आहे. एवढेच नाही तर, याआधी त्यांनी लवकरच अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्याची अपेक्षाही व्यक्त केली होती. वाचा- भयंकर! इथे लोकं मृतदेहाशेजारीच झोपतात आणि त्यांना जेवायला सुद्धा देतात तसेच, यावेळी ट्रम्प यांनी पत्रकारांना, “असा अंदाज आहे की दोन आठवड्यांत मृत्यू दर शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. जूनपर्यंत अमेरिका पुन्हा पुर्वपदावर येण्यास सज्ज होईल”, अशी माहिती दिली. ट्रम्प यांनी प्रोजेक्शन मॉडेल्सचा हवाला देत, “सामाजिक अंतर आणि इतर उपाययोजना न केल्यास 2.2 दशलक्ष किंवा त्याहून अधिक लोकांचा मृ्त्यू होईल. म्हणूनच, जर आपण हे सांगत राहिलो की 1 लाख ही एक भयानक संख्या आहे पण 20 लाख लोकांचा मृत्यू होण्यापेक्षा ती कमीच आहे", असे सांगितले. वाचा-लॉकडाऊननंतर कोरोनाचा उद्रेक, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; सांगितला बचावाचा मार्ग राज्यांच्या सीमा सील ट्रम्प यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विट करून सांगितलं की, ट्रॅव्हल अॅडव्हायजरी लागू करणं चांगला उपाय आहे. राज्याच्या सीमा सील करण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी अवैध असल्याचं म्हटलं होतं. ट्रॅव्हल अॅडव्हायजरीनुसार तीन राज्यातील रहिवाशांना दोन आठवड्यापर्यंत कोणताही प्रवास करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. या दरम्यान, कुओमो यांनी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या प्रायमरी इलेक्शनला एप्रिलऐवजी जूनमध्ये घेण्यात येतील असं सांगितलं आहे. वाचा-कोरोनाचा अमेरिकेत हाहाकार! एका दिवसात 19 हजार नवे रुग्ण, संकटातही ट्रम्प हट्टी जगात हाहाकार जगभरात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 33 हजार 976 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त इटली 10 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीनंतर अमेरिकेतही कोरोनाचा धोका वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे. मागच्या तीन दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत तीनपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 19 राज्यांमध्ये सरासरी 1 हजार रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या