वॉशिंग्टन, 29 मार्च : अमेरिकेत कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. यामध्ये न्यूयॉर्क शहर कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या 1,23,000 पेक्षा जास्त झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 2200 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात अमेरिकेत 19 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाउनची घोषणा करण्यास नकार दिला आहे. याआधी ट्रम्प यांनी न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये लॉकडाउन लागू न करण्याच्या घोषणेनं धक्का दिला आहे.
ट्रम्प यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विट करून सांगितलं की, ट्रॅव्हल अॅडव्हायजरी लागू करणं चांगला उपाय आहे. राज्याच्या सीमा सील करण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी अवैध असल्याचं म्हटलं होतं. ट्रॅव्हल अॅडव्हायजरीनुसार तीन राज्यातील रहिवाशांना दोन आठवड्यापर्यंत कोणताही प्रवास करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. या दरम्यान, कुओमो यांनी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या प्रायमरी इलेक्शनला एप्रिलऐवजी जूनमध्ये घेण्यात येतील असं सांगितलं आहे.
On the recommendation of the White House CoronaVirus Task Force, and upon consultation with the Governor’s of New York, New Jersey and Connecticut, I have asked the @CDCgov to issue a strong Travel Advisory, to be administered by the Governors, in consultation with the....
जगभरात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 31 हजार 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त इटली 20 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीनंतर अमेरिकेतही कोरोनाचा धोका वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत शनिवारी 24 तासांत तब्बल 525 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत एकूण 2200 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे आहे. मागच्या तीन दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत तीनपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 19 राज्यांमध्ये सरासरी 1 हजार रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळते.
ट्रम्प यांनी 16 मार्च रोजी 15 दिवसांसाठीची योजना सांगितली होती. त्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काही योजना राबवण्यात आल्या होत्या. मात्र अमेरिकेत संसर्गाची गती आधीच अनेक पटींनी वाढली आहे. यानंतर अमेरिकेत निर्बंध लादण्याऐवजी ट्रम्प यांनी आधीचेच काही निर्बंध शिथिल केले आहेत. ट्रम्प सरकारने अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी आणि कोरोनासोबत लढण्यासाठी ट्रिलियन डॉलर्सचा निधीही जाहीर केला आहे.