Home /News /national /

लॉकडाऊननंतर होऊ शकतो 'कोरोना'चा उद्रेक, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; सांगितला बचावाचा मार्ग

लॉकडाऊननंतर होऊ शकतो 'कोरोना'चा उद्रेक, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; सांगितला बचावाचा मार्ग

डॉ. कॅमरननी सांगितलं, डास चावल्यानं फक्त डेंग्यू, यलो फिवर, चिकनगुनिया, रोज फिवर आणि जीका व्हायरसचं संक्रमण होतं.

डॉ. कॅमरननी सांगितलं, डास चावल्यानं फक्त डेंग्यू, यलो फिवर, चिकनगुनिया, रोज फिवर आणि जीका व्हायरसचं संक्रमण होतं.

लॉकडाऊनमुळे (Lockdown) कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) संक्रमण कमी होईल, मात्र तरीही हा व्हायरस थांबणार नाही, असं अर्थशास्त्रतील नोबेल विजेत्यांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 30 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) भारतात (India) लॉकडाऊन (Lockdown) आहे. मात्र हा लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोनाव्हायरसचं नेमकं काय होणार, ज्यासाठी हा लॉकडाऊन ठेवण्यात आला तो प्रयत्न यशस्वी होणार का?, असे अनेक प्रश्न पडलेत. या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ते 2 नोबेल विजेत्या (Nobel winner) अर्थशास्त्र तज्ज्ञांनी. लॉकडाऊनमुळे कोरोनाव्हायरसचं संक्रमण कमी होईल, मात्र तरीही हा व्हायरस थांबणार नाही, कदाचित लॉकडाऊननंतर त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि त्यासाठी आपण तयार राहायला हवं, असं अर्थशास्त्रतील नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफलो यांनी द इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या लेखात असं म्हटलं आहे. हे वाचा - लॉकडाऊन संपल्यानंतर 'कोरोना'च्या उद्रेकाची शक्यता, तज्ज्ञांनी दिली धोक्याची घंटा लॉकडाऊननंतर उद्धवणाऱ्या या परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय करायला हवं हेदेखील या नोबेल विजेत्यांनी सांगितलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील किमान एका व्यक्तीला तरी आजाराची प्रमुख लक्षणं माहिती असायला हवीत. शिवाय कितीही काळजी घेतली तरी काही लोकांना हा संसर्ग होऊ शकतो, याबाबत जागरूक करायला हवं. यामुळे आजार लपवणं, सामाजिक बहिष्कार अशी प्रकरणं होणार नाहीत. शिवाय प्रकरणांबाबत रिपोर्ट करण्यासाठी हॉटलाइन असायला हवी किंवा आशासेविका असाव्यात. दुर्गम गावात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे कोणती पदवी नसते, अशावेळी त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं, जेणेकरून अशा आजाराच्या रुग्णाला ओळखून ते संबंधित अधिकाऱ्याला याबाबत माहिती देऊ शकतील रिपोर्टची तुलना लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून आजार आणखी कुठे पसरू शकतो याचा अंदाज येईल. देशभरातील प्रकरणांवर लक्ष असावं. हे वाचा - मन की बात : लॉकडाऊनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली माफी प्रत्येक राज्यात एक मोबाइल टीम असावी, यामध्ये डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी असावेत. त्यांच्याकडे टेस्ट किट, वेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणं असावीत. जिथंही कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढत असतील, तिथं ही टीम जाई आणि तपासणी, उपचार सुरू करेल. हे लॉकडाऊन यशस्वी झालं तरी विविध ठिकाणी आजार डोकं वर काढताना दिसू शकतो. काही ठिकाणी याचा उद्रेकही होऊ शकतो. अशावेळी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असलेली ही मोबाईल टीम महत्त्वपूर्ण असेल. यासाठी सर्व आरोग्य तज्ज्ञांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. सरकारी आणि खासगी आरोग्य तज्ज्ञांनी गरज पडेल तिथं जाण्याची तयारी ठेवावी, खासगी आणि सरकरी दोन्ही रुग्णालयातील परिस्थिती सांभाळावी. सोशल ट्रान्सफर स्कीम लागू करावी, जेणेकरून अर्थव्यवस्था डगमगणार नाही आणि लोकं नियम मोडणार नाही. सध्या सरकार जी काही सोय करत आहे, तितकी पुरेशी नाही. लोक घराबाहेर पडू नयेत, यासाठी त्यांना आर्थिक मदत करायला हवी. एका विशिष्ट गटासाठी योजना देण्याऐवजी युनिव्हर्सल कव्हरेज द्यायला हवं आणि ज्या लोकांना गरज नाही ते स्वत:हून हे मदत नाकारतील असा मार्ग शोधायला हवा. जनधन, आधार, मोबाईल याचा फायदा करून घेण्याची ही योग्य वेळ आहे. सरकार थेट गरजू लोकांच्या खात्यात पैसे जमा करू शकतं. सर्वात शेवटचं जोपर्यंत या व्हायरसवर लस येत नाही, तोपर्यंत युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहायला हवं. त्यानंतर शक्य तितक्या लोकांना लस दिली जावी आणि आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर द्यावा जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती आल्यास त्यासाठी आपण तयार असू.  हे वाचा - CoronaVirus : लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त, UNICEF ने सांगितलं घरात बसून काय करायचं
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या