'जर हे खरं असेल तर...', किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रीया

'जर हे खरं असेल तर...', किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रीया

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने किम जोंग उन यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती दिली होती. मात्र किम यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

  • Share this:

वॉशिंग्टन, 22 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांची प्रकृतीविषयीची खरी माहिती फक्त त्यांच्या निकटवर्तीयांना असण्याची शक्यता आहे. किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी अमेरिकन माध्यमांनी बातमी दिल्यानंतर जगभरातून याविषयी उलट-सुलट बातम्या आणि चर्चा सुरू झाल्या. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी किम यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले होते, त्यानंतर दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली. त्यामुळे अद्याप किम यांच्या प्रकृतीबाबत कोणतीच माहिती नाही आहे. यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत प्रतिक्रीया दिली आहे.

ट्रम्प यांनी किम जोंग यांच्या प्रकृतीबाबात सांगितले की, "काही बातम्या येत आहेत, पण आम्हाला काहीही माहिती नाही. माझे त्याच्याशी खूप चांगले संबंध आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो, जर त्यांची प्रकृती खरच नाजूक असेल तर परिस्थिती गंभीर आहे आहे". ट्रम्प पुढे म्हणाले की, "मी बर्‍याचदा असे म्हटले आहे की या स्थितीत दुसरे कोणी असते तर आम्ही उत्तर कोरियाशी युद्ध केले असते. पण आम्ही युद्ध करणार नाही". किम जोंग यांची यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. प्रकृती अद्याप नाजूक असून अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या मृत्यूची शक्यताही व्यक्त केली होती.

वाचा-किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत दक्षिण कोरियामधून आली सर्वात मोठी बातमी

'शस्त्रक्रिया यशस्वी झाली, आता विश्रांती घेत आहेत किम'

न्यूज एजन्सी रॉयटर्सने डेली एनके या सियोलच्या न्यूज वेबसाइटच्या हवाल्याने असे वृत्त दिले आहे की, किम यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या त्यांना माउंट कुमगांग येथील रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी ठेवण्यात आले आहे. या वृत्तानुसार, 12 एप्रिल रोजी किम जोंग यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाचे मंत्रालय आणि नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना तातडीने वृत्ताबाबत सांगता येणार नाही. दोन कोरियन देशांमधील प्रकरणे हाताळणारे युनिफिकेशन मंत्रालय म्हणाले की, प्योंगयांग येथे किम यांच्यावर हृदयविकाराची शल्यक्रिया झाली आहे, मात्र त्यांची प्रकृती सुधारत आहे.

वाचा-किम जोंग उन यांना नेमकं झालं काय? Grave Danger चा काय आहे अर्थ?

सीएनएनने केला होता दावा

सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011पासून उत्तर कोरियामध्ये किम सत्तेवर आल्यापासून, त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवला नाही आहे. दरम्यान,अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत, असा दावा केला आहे.

वाचा-किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी

First published: April 22, 2020, 10:24 AM IST

ताज्या बातम्या