मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Facebook, Twitter ने बंदी घातल्यामुळे Donald Trump सुरू करणार स्वत:ची social media site!

Facebook, Twitter ने बंदी घातल्यामुळे Donald Trump सुरू करणार स्वत:ची social media site!

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच सोशल मीडियावर (Social Media) परत येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच सोशल मीडियावर (Social Media) परत येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच सोशल मीडियावर (Social Media) परत येण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन, 30 मार्च : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) लवकरच सोशल मीडियावर (Social Media) परत येण्याची शक्यता आहे. अमेरिकीतील कॅपिटॉल हिल (Capitol Hill) मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक (Facebook) आणि ट्विटर (Twitter) या बड्या साईट्सने ट्रम्प यांच्यावर कायमची बंदी घातली आहे. त्यावर ट्रम्प यांनी मार्ग शोधला असून ते लवकरच स्वत:ची सोशल मीडिया साईट सुरू करण्याची शक्यता आहे.

'या साईटवर माजी अध्यक्ष अमेरिकेच्या लोकांशी त्यांचे विचार शेअर करू शकतील. त्याचबरोबर अन्य व्यक्तींनाही कोणत्याही दडपणाशिवाय मुक्तपणे त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल,' अशी माहिती ट्रम्प यांचे निकटवर्तीय कोरी लेवांडोव्स्की यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

यापूर्वी ट्रम्प यांची माजी सल्लागार जेसन मिलन यांनी देखील ट्रम्प लवकरच सोशल मीडियावर परत येतील हा दावा केला होता. 'लवकरच सर्व परिस्थिती बदलणार असून ट्रम्प काय करणार आहेत हे सर्वांना माहिती होईल. हा ट्रम्प यांचा स्वत:चा प्लॅटफॉर्म असेल,' असं मिलन यांनी सांगितलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे अनेकदा चर्चेत होते. त्यांच्या ट्विट्सवर अनेकदा बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांच्यावर खोटी माहिती शेअर केल्याचा ठपका देखील ट्विटरनं केला होता. अमेरिकेतील कॅपिटॉल हिलमध्ये ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर 88 मिलियम फॉलवर्स असलेल्या ट्रम्प यांच्या अकाऊंटवर ट्विटरनं अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. ट्विटरनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूब  (YouTube) या सोशल मीडिया साईटने देखील ट्रम्प यांच्यावर बंदी घातली आहे.

(वाचा : संकटात आठवला शेजारी, पाकिस्तान भारताकडे करणार मदतीची विनंती! )

लग्न कार्यक्रमात केलं भाषण -

व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतरही ट्रम्प सार्वजनिक आयुष्यात सक्रीय आहेत. फ्लोरिडामध्ये नुकत्याच एका लग्न कार्यक्रमात ट्रम्प यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या परराष्ट्र धोरणांवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर तुम्ही मला मिस करता का? असा प्रश्न देखील लग्न समारंभात उपस्थित असलेल्या लोकांना त्यांनी विचारला. ट्रम्प यांचं हे भाषण सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Donald Trump, Facebook, Instagram, Joe biden, Twitter, Youtube