संकटात आठवला शेजारी, पाकिस्तान भारताकडे करणार मदतीची विनंती!

संकटात आठवला शेजारी, पाकिस्तान भारताकडे करणार मदतीची विनंती!

पाकिस्तानातील कापड उद्योग (Cotton industry in Pakistan) सध्या संकटात सापडला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना भारताच्या मदतीची आवश्यकता आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 30 मार्च : पाकिस्तानातील कापड उद्योग (Cotton industry in Pakistan) सध्या संकटात सापडला आहे. कापड उद्योगाला कच्चा मालाची टंचाई जाणवत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी भारतामधून होणाऱ्या कापूस आयातीवरील (Cotton Imports) बंदी उठवण्याची शिफारस पंतप्रधान इम्रान खान  (Imran Khan) यांच्या अध्यक्षतेखालील वस्त्रोद्योग मंत्रालायने केली आहे. पाकिस्तानातील माध्यमांनी याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

द डॉन न्यूज (The Dawn News) सरकारी सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, वस्त्रोद्योग मंत्रालयाने (Ministry of Textile Industries) भारतामधील कापूस आणि सूती धाग्यावरील आयातीवरील निर्बंध हटवण्यासाठी कॅबिनेटच्या आर्थिक समन्वय समितीकडे (ECC) परवानगी मागितली आहे.

समन्वय समितीचा निर्णय औपचारिक परवानगीसाठी केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे प्रभारी म्हणून याबाबतचे निवेदन आर्थिक समन्वय समितीसमोर सादर करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तानमध्ये यंदा कापसाचे उत्पन्न कमी झालं आहे, त्यामुळे या अडचणीच्या प्रसंगी त्यांना भारताच्या मदतीची अपेक्षा आहे.

भारताची गरज का?

पाकिस्तान सध्या अमेरिका, ब्राझील आणि उझबेकिस्तान या देशांकडून कापसाची आयात करत आहे. या देशांपेक्षा भारताकडून कापासाची आयात करणं पाकिस्तानसाठी स्वस्त आहे. तसंच भारतामधून कापसाचा माल देखील पाकिस्तानमध्ये तीन ते चार दिवसांमध्ये येऊ शकतो. तर अन्य देशांचा कापूस हा भारतापेक्षा महाग असून तो पाकिस्तानमध्ये दाखल  होण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

( वाचा : पाकिस्तानात होळीला गालबोट, 100 वर्ष जुन्या मंदिरावर हल्ल्याची घटना उघड )

या कारणांमुळे पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने भारताकडे मदत मागण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मान्य केल्यानंतर याबाबत भारत सरकारकडे मदतीची विनंती करण्यात येणार आहे.

Published by: News18 Desk
First published: March 30, 2021, 3:28 PM IST

ताज्या बातम्या