काबूल, 21 जानेवारी: मुलींच्या शिक्षणाला (
Girl Education) नेहमीच कडाडून विरोध (
Oppose) करणाऱ्या तालिबानकडून (
Taliban) महिला शिक्षण (
girl’s education) पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तालिबानची यापूर्वी जेव्हा अफगाणिस्तानमध्ये राजवट होती, तेव्हा मुलींच्या शिक्षणाला बंदी होती. मुलींनी केवळ घर, संसार आणि मुलांचा सांभाळ करावा, असं तालिबानचं म्हणणं होतं. मात्र आता स्वतः तालिबाननंच मुलींच्या शाळा आणि कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमागे नेमके काय कारण असावं, याविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र अखेर तालिबानच्या मंत्र्यांनीच हे कारण उघड केलं आहे.
हे आहे कारण
तालिबान सरकारमध्ये मंत्री मौलवी नुरुल्लाह मुनीर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीतून हे कारण समोर आलं आहे. मुलींच्या आणि तरुणींच्या शिक्षणाची जबाबदारी ही तालिबानची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अफगाणिस्तानवर आता तालिबानची सत्ता असल्यामुळे देशाच्या विकासासाठी मुलींनी शिकणं गरजेचं असल्याचं ते म्हणतात. त्यामुळे सरकारनं आपली जबाबदारी म्हणूनच मुलींच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
जागतिक दबाव नाकारला
तालिबाननं मुलींच्या शिक्षणाला सुुरुवात करावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जागतिक दबाव वाढत असल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी तालिबाननं अफगाणिस्तानच्या राजधानीवर ताबा मिळवला आणि त्या दिवसापासून देशातील तमाम शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत. मुलं आणि मुली सर्वांचंच शिक्षण बंद असून या पिढीचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र तालिबाननं घेतलेला शाळा सुरू करण्याचा निर्णय़ या कुठल्याही जागतिक दबावापोटी घेतलेला नसून आपली जबाबदारी म्हणूनच घेतल्याचं तालिबानचे मंत्री मुनीर यांनी स्षष्ट केलं आहे.
हे वाचा-
भ्रष्टाचाराचा विरोध केल्याबद्दल चँपियन बॉक्सरला मृत्यूदंड
तारीख ठरली नाही
अफगाणिस्तानमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी कधीपासून याची प्रत्यक्ष सुरूवात होणार, याची तारीख मात्र ठरलेली नाही. मात्र लवकरच त्याची घोषणा केली जाईल, अशी माहिती तालिबानच्या वतीनं देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.