Home /News /videsh /

भ्रष्टाचाराचा विरोध केल्याबद्दल चँपियन बॉक्सरला मृत्यूदंड, इराण सरकारचा उलटा न्याय

भ्रष्टाचाराचा विरोध केल्याबद्दल चँपियन बॉक्सरला मृत्यूदंड, इराण सरकारचा उलटा न्याय

सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या चँपियन बॉक्सरला इराण सरकारनं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

    तेहरान, 20 जानेवारी: भ्रष्टाचाराला (Corruption) विरोध केल्याच्या रागातून इराणमध्ये (Iran) एका चँपियन बॉक्सरला (Champion boxer) मृत्यूदंडाची (Death Sentence) शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाल्याचा आरोप त्याने केला होता. त्यानंतर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला मृ्त्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अद्याप या शिक्षेची अंमलबजावणी करण्याात आलेली नाही. मात्र ही बाब आता जागतिक पातळीवर पोहोचल्यामुळे इराणच्या या अजब कृतीचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.  काय आहे प्रकरण? इराणचा लोकप्रिय चँपियन बॉक्सर मोहम्मद जवादनं सरकारमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आक्षेप घेतल्यानंतर त्याच्यावर खटला भरून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2019 साली सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात झालेल्या आंदोलनात बॉक्सर मोहम्मद जवादनं सहभाग घेतला होता. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये नाविद अफकारी नावाच्या एका पैलवानालाही सरकारविरोधात भूमिका घेतल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.  जागतिक पातळीवर निषेध  इस्त्रायला वर्तमानपत्र जेरुसलेम पोस्टने दिलेल्या माहितीनुसार पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्या मसीद अलिनेजाद यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं आहे. त्यांनी एक ट्विट करत या प्रकरणाची माहिती समोर आणली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या एका आंदोलनासाठी एका खेळाडूला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद जवाद हा एक राष्ट्रीय चँपियन आहे. पृथ्वीवर भ्रष्टाचार पसरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे.  हे वाचा - जगभरातील खेळाडूंना आवाहन जगभरातील खेळाडू आणि ऍथलिट एकत्र आले, तर मोहम्मद जवादला वाचवण्यात यश येऊ शकतं, अशी भूमिका जवाद समर्थकांनी घेतली आहे. जगाच्या पटलावर हा विषय पोहोचल्यामुळे इराणवरील दबावही वाढत चालला आहे. इराणमध्ये देशाविरोधात बोलणाऱ्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boxer, Death, Government, Iran

    पुढील बातम्या