अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची सोशल मीडियात चर्चा; पण हे आधी वाचा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची सोशल मीडियात चर्चा; पण हे आधी वाचा

दाऊद आणि त्याची बायको महजबीन (Mahzabeen) या दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्तानंतर आता दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 जून : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) कोरोनामुळं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी दाऊद आणि त्याची बायको महजबीन (Mahzabeen) या दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त होतं. एवढेच नाही तर या दोघांनाही कराचीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं. आता सोशल मीडियावर दाऊदचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र दाऊदचा भाऊन अनीसनं या सगळ्या अफवा असल्याचं IANSला सांगितलं आहे.

दाऊद आणि त्याचं कुटुंबीय कराचीमधल्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागात राहतात. या भागात लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे. दाऊदचा भाऊ असिननं असा दावा केला आहे की, त्याचा भाऊ आणि कुटुंबातील सर्व सदस्य पूर्णपणे निरोगी आहेत. त्यामुळं दाऊदचा कोरोनामुळं मृत्यू किंवा त्याला कोरोनाची लागण खरच झाली आहे का? अशा चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

वाचा-मास्क घालण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केले नवे निर्देश

दरम्यान, दाऊद आणि त्याच्या बायकोला कोरोना झाल्याच्या वृत्तानंतर त्याच्या गार्ड्स आणि इतर स्टाफला क्वारंटाइन करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. तसेच, पाकिस्तान सरकारकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. यातच आज सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या केवळ चर्चा असून यात कितपत सत्या आहे, याचा पाठपुरावा केला जात आहे.

वाचा-क्या बात है! भारतात सुरू झालं कोरोना लसीचं उत्पादन, 'या' कंपनीशी झाला करार

दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. यानंतरही पाकिस्तान त्याला पूर्ण संरक्षण देत आहे. दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे भारताने पाकिस्तानला वारंवार दिले होते. मात्र पाकिस्तानने ते कधीच मान्य केलेलं नाही. 1993च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात पळून गेला होता. तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर असून तो सगळ्यांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला आहे. यातच आता कोरोनामुळं पुन्हा एकदा दाऊद चर्चेत आला आहे.

वाचा-कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारत इटलीच्याही पुढे; पण तरीही आहे 'हा' दिलासा

First published: June 6, 2020, 1:09 PM IST

ताज्या बातम्या