मराठी बातम्या /बातम्या /देश /

मास्क घालण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केले नवे निर्देश

मास्क घालण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केले नवे निर्देश

गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे.

गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे.

गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 06 जून : कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेनं तोंडाला मास्क लावण्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. WHO ने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये म्हटलं आहे की सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन ज्या ठिकाणी होत नाही तिथे मास्क घालणं बंधनकारक आहे. नवीन गाइडलाइमध्ये हे मास्क कसे असावेत आणि त्यासाठी कोणतं साहित्य वापरण्यात यावं याबाबतही माहिती देण्यात आली आहे. हे मास्क तुम्ही घरी तयार करू शकता किंवा दुकानातून अथवा मेडिकलमधूनही खरेदी करू शकता. हे मास्क खरेदी करताना ते कापडी असावेत याची काळजी घ्या. घरी मास्क तयार करताना त्यामध्ये तीन लेअर असावेत. हनुवटीपासून डोळ्यांच्या खालच्या भागापर्यंत झाकणारे मास्क वापरावे. हा मास्क सॅनिटाइझ करावा शक्य असेल तर धुवावा. एका कपड्याचा मास्क हा कोरोनापासून बजाव करेलच हे सांगता येत नाही. हे वाचा-कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारत इटलीच्याही पुढे; पण तरीही आहे 'हा' दिलासा गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक आहे. मास्क वापरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल. रेल्वे, बस, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं गरजेचं आहे. केवळ फेसमास्कवर अवलंबून राहाणंही धोक्याचं आहे असं WHO चे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस एडहेनॉम यांचं मत आहे. यासाठी इतर उपाययोजना आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळणं गरजेचं आहे. याशिवाय आरोग्याची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि इतर उपययोजना जसं की सॅनिटाइझ, योग्य आहार इत्यादी करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. हे वाचा-क्या बात है! भारतात सुरू झालं कोरोना लसीचं उत्पादन, 'या' कंपनीशी झाला करार संपादन- क्रांती कानेटकर
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Who

पुढील बातम्या