कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारत इटलीच्याही पुढे; पण तरीही आहे 'हा' दिलासा

कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारत इटलीच्याही पुढे; पण तरीही आहे 'हा' दिलासा

भारतात आता 2 लाख 36 हजार 657 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 6642 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतानं कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आता इटलीला मागे टाकलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जून : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात सर्वात जास्त नवीन प्रकरणं आणि सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 9887 नवीन प्रकरणं समोर आली असून एकूण 294 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतात आता 2 लाख 36 हजार 657 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 6642 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतानं कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आता इटलीला मागे टाकलं आहे.

काही महिन्यांपूर्वी इटली हे कोरोनाचं केंद्र झालं होतं. मात्र भारतानं इटलीला मागे टाकत जगभरातील कोरोनाबाधितांमध्ये भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि ब्रिटन यांचा क्रमांक लागतो. मात्र अस असले तरी, भारताचा मृत्यूदर हा इतर सर्व देशांपेक्षा कमी आहे. भारताचा मृत्यूदर 2.81% आहे. भारतापेक्षा केवळ रशियाचा मृत्यूदर कमी आहे. रशियामध्ये 4 लाख 49 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र त्यातील केवळ 5528 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं रशियाचा मृत्यू दर हा 1.23% आहे.

वाचा-कोरोनाने पुन्हा एकदा देशात विक्रम मोडला, 24 तासांतली ही आकडेवारी धक्कादायक

भारतानं कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये इटलीला मागे टाकले असले तरी इटलीचा मृत्यू दर सर्वात जास्त आहे. इटलीमध्ये 2 लाख 34 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 33 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इटलीचा मृत्यूदर 14.40 आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त असला तरी मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे.

वाचा-टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका, नवा रिसर्च आला समोर

भारतात मृत्यूदरात घट

देशात आतापर्यंत कोरोनाची 1 लाख 15 हजार 942 अॅक्टिव्ह प्रकरणं असून 1 लाख 14 हजार 072 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. तर आतापर्यंतचा मृतांचा आकडा 6642 आहे. शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरस (Coronavirus Maharashtra) संक्रमणाची 2,436 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 80,229 वर पोहोचला आहे. याव्यतिरिक्त राज्यात 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा मृतांचा आकडा 2,849 वर पोहोचली आहे.

वाचा-देशात कोरोनानं वाढवली चिंता! वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा होणार लॉकडाऊन?

First published: June 6, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या