मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्या बात है! भारतात सुरू झालं कोरोना लसीचं उत्पादन, 'या' कंपनीशी झाला करार

क्या बात है! भारतात सुरू झालं कोरोना लसीचं उत्पादन, 'या' कंपनीशी झाला करार

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिक्‍स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, 2021 जुलैपर्यंत उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिक्‍स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी सरकारनं राज्यांकडून यादी मागवली आहे.

100 हून अधिक कंपन्या सध्या कोरोना लस तयार करत आहेत. पण आतापर्यंत कोणालाही यश मिळालेलं नाही. यातच आता ब्रिटनच्या औषध कंपनीनं भारतात लसीचं उत्पादन सुरू केलं आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 06 जून : एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना अद्यार कोरोनावर लस शोधण्याच यश आलेले नाही आहे. 100 हून अधिक कंपन्या सध्या कोरोना लस तयार करत आहेत. पण आतापर्यंत कोणालाही यश मिळालेलं नाही. यातच आता ब्रिटनच्या औषध कंपनीनं भारतात लसीचं उत्पादन सुरू केलं आहे. ब्रिटनची औषध तयार करणारी कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकानं (astrazeneca) ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीच्या कोट्यावधी डोसची निर्मिती सुरू केली आहे. या लसीचे उत्पादन ब्रिटन, स्वित्झर्लंड, नॉर्वे तसेच भारतात केले जात असल्याचे कंपनीनं म्हटलं आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने AZD1222 नावाची कोरोना लस तयार केली आहे. सुरुवातीच्या चाचणीत लसीचा निकाल चांगला लागला आहे आणि पुढच्या फेरीची चाचणी अद्याप सुरू आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेकानं सीईओ पॅस्कल सोरिअट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, आम्ही लस तयार करण्यास सुरवात करीत आहोत. येत्या काही महिन्यात आमच्याकडे लस तयार असेल. मात्र या रिस्कही आहे. जर ही लस यशस्वी नाही झाली तर मेहनत वाया होईल. पॅस्कल यांनी सांगितले की, कंपनी लसीच्या उत्पादनातून नफा तोपर्यंत कमवणार नाही जोपर्यंत WHO कोरोना संपुष्टात आल्याचे जाहीर करत नाही. वाचा-ठरलं! 'या' महिन्यात कोरोनावर लस मिळणार, 5 कंपन्या ट्रायलसाठी सज्ज पॅस्कल सोरिअट यांनी असेही सांगितले की, त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला असून एक अब्ज लस डोस तयार केले जाणार आहे. 2021 पर्यंत एक अब्ज लसीचे डोस तयार करण्याचे लक्ष्य आहे. त्याच बरोबर 2020 च्या अखेरीस 40 कोटी डोस तयार होऊ शकतात. तर सप्टेंबरपर्यंत या लसीचे लाखो डोस तयार झालेले असतील. अ‍ॅस्ट्रॅजेनेका या कंपनीनं अमेरिकेशी 40 कोटी लस पुरवण्याचा करार केला आहे. तर, ब्रिटनला 10 कोटी लस देणार आहे. दरम्यान कंपनीने असेही स्पष्ट केलं आहे की लसीचे ट्रायल झाल्याशिवाय त्याचा पुरवठा केला जाणार नाही. वाचा-कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारत इटलीच्याही पुढे; पण तरीही आहे 'हा' दिलासा AZD1222 लसीचा प्रयोग ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वतीनं ऑगस्टपर्यंत लसीचा अंतिम निर्णय मिळेल. सुरुवातीला AZD1222 लसीचा प्रयोग 18 से 55 वर्षांच्या 160 निरोगी लोकांवर करण्यात आला. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलला सुरुवात झाली. तिसऱ्या टप्प्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठानं लहान मुलं आणि वृद्ध अशा एकूण 10260 लोकांवर लसीचा प्रयोग केला. दरम्यान दोन प्रयोग यशस्वी झाले असून, तिसऱ्या प्रयोगाचा निकाल लवकरच लागेल. 5 कंपन्या ट्रायलसाठी सज्ज अमेरिकेतील प्रशासनानं कोरोना लसीसाठी 5 संभाव्य कंपनींची निवडही केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांमध्ये मॉडर्ना इंक, एस्ट्राजेनेका पीएलसी, फाइजर इंक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि मर्क एंड को इंक या कंपन्यांचा समावेश आहे. सरकारच्या वतीनं सरकारला अतिरिक्त फंडही देण्यात येणार आहे. दरम्यान अद्याप कोणत्याही लसीला किवा औषधाला मान्यता मिळालेली नाही आहे. वाचा-टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका, नवा रिसर्च आला समोर
First published:

Tags: Corona vaccine

पुढील बातम्या