• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • कोल्हापूरच्या लेकीचं अमेरिकेत मोठं यश; 300 वर्षांचा इतिहास मोडीत काढत नगरसेवक पदावर विराजमान

कोल्हापूरच्या लेकीचं अमेरिकेत मोठं यश; 300 वर्षांचा इतिहास मोडीत काढत नगरसेवक पदावर विराजमान

अमेरिकेतील न्यूजर्सी भागातील 'होपवेल टाउनशिप' येथे पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उर्मिला अर्जुनवाडकर यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे.

 • Share this:
  कोल्हापूर, 19 नोव्हेंबर: गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेच्या राजकारणात (American Politics) अनेक भारतीय वंशाचे लोकं सक्रिय झाले आहेत. निवडणुकांमध्ये (Election in america) घवघवीत यश मिळवत अनेकांनी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन केला आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिश सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत. तसेच अन्य काही भारतीय वंशाच्या नागरिकांची महत्त्वांच्या पदावर वर्णी लागली आहे. यानंतर आता महाराष्ट्र आणि कोल्हापुरकरांच्या (Kolhapur) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील न्यूजर्सी भागातील 'होपवेल टाउनशिप' येथे पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उर्मिला अर्जुनवाडकर (Urmila Arjunwadkar) यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. त्यांनी स्थानिक रहिवासी एडवर्ड एम जॅकोवस्की यांचा एक हजार मताधिक्यानी पराभव केला आहे. होपवेल टाउनशिपच्या तीनशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांच एक भारतीय वंशांची महिला नगरसेवक म्हणून पदभार स्विकारणार आहेत. होपवेल टाउनशिपच्या नागरिकांनी विश्वास ठेवून निवडून दिल्याने उर्मिला यांनी मतदारांचं मनापासून आभार मानले आहेत. हेही वाचा-ट्रॅक्टरच्या धडकेत वाचले पण ट्रकनं चिरडलं; जीवलग मित्रांचा रस्त्यावरच गेला प्राण उर्मिला अर्जुनवाडकर मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत. येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्याचं शिक्षण जयसिंगपूर आणि सांगलीत पूर्ण झालं आहे. सध्या त्या अमेरिकेतील होपवेल टाउनशीप येथे वास्तव्याला आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्या येथेच वास्तव्याला आहे. सलग वीस वर्षे होपवेल टाउनशीपमध्ये वास्तव्य केल्यानंतर, अलीकडेच त्यांनी नगरसेवकासाठी उमेदवारी जाहीर केली होती. हेही वाचा-देशासाठी लढण्याचं स्वप्न हवेत विरलं; रणभूमीत जाण्याआधीच जवानाला मृत्यूनं गाठलं या निवडणुकीत त्यांनी स्थानिक रहिवासी एडवर्ड एम जॅकोवस्की यांचा एक हजार मताधिक्यानी पराभव केला आहे. तीनशे वर्षांचा इतिहास मोडीत काढत त्या नगरसेवक पदावर विराजमान झाल्या आहेत. निवडणुकीत त्यांचा विजय होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: