कोल्हापूर, 14 नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात भीषण अपघाताची (terrible accident) घटना समोर आली आहे. येथील चंदगड गडहिंग्लज मार्गावर झालेल्या अपघातात दोन जीवलग मित्रांचा हृदयद्रावक शेवट (2 college friend death) झाला आहे. उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना, ट्रॉलीला धडकून खाली पडलेल्या दोन तरुणांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकनं चिरडलं आहे. या दुर्दैवी घटनेत दोन्ही तरुणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. कॉलेजमधील जीवलग मित्रांचा अशा प्रकारे शेवट झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जय ज्योतिबा मासरणकर (वय-19) आणि अजित आप्पाजी पाटील (वय-18) असं मृत पावलेल्या दोन्ही तरुणांची नावं असून ते दोघंही चंदगड तालुक्यातील सातवणे येथील रहिवासी आहेत. दोघंही कॉलेजचे चांगले मित्र होते. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जय आणि अजित इलेक्ट्रिक साहित्य घेऊन दुचाकीने अडकूर येथून आपल्या गावी सातवणेला निघाले होते.
हेही वाचा-सांगोला: अपघात घडवून 45लाखांचं सोन्याचं बिस्किट पळवलं; मित्रच निघाला मास्टरमाइंड
दरम्यान आसगोळी फाट्याजवळ आले असता, त्यांच्यासमोर मंद गतीने उसाने भरलेला ट्रॅकर जात होता. संबधित ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना, उसाच्या ट्रॉलीला धडकून दोघंही रस्त्यावर खाली पडले. याच वेळी समोरून आलेल्या ट्रकने दोघांना चिरडलं आहे. या दुर्दैवी घटनेत दोघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा या अपघाताची माहिती चंदगड पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास केला जात आहे.
हेही वाचा-नागपुरातील महिलेची मध्य प्रदेशात विक्री; 16 महिन्यांनी भयावह अवस्थेत आढळली पीडित
लांबचा प्रवास नसल्यानं संबंधित तरुणांनी हेल्मेट परिधान केलं नव्हतं. हेल्मेट असतं तर तरुणांचा जीव वाचला असता, अशी हळहळ परिसरात सुरू होती. कॉलेजच्या जीवलग मित्रांवर अशाप्रकारे एकाच दिवशी काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत. मृत जयच्या पाठीमागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तर अजितच्या पाठीमागे आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास चंदगड पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike accident, Kolhapur